डोमकावळा

पक्ष्यांच्या प्रजाती

डोमकावळा तथा रानकावळा (शास्त्रीय नाव: Corvus macrorhynchos) आशियाई वनांमध्ये आढळणारा सामान्य कावळ्यापेक्षा आकाराने थोडा मोठा असलेला पक्षी. याला जंगली कौआ या नावानेही ओळखतात.

डोमकावळा
डोमकावळा

हा संपूर्णपणे काळ्या रंगाचा असतो.

माहिती संपादन

मोठी चोच असणाऱ्या ह्या पक्ष्याला इंग्लिशमध्ये लार्ज-बिल्ड क्रो (शास्त्रीय नाव 'कॉर्व्हस मॅक्रोऱ्हिन्चॉस') असे म्हणतात. हा एक आशिया कावळा या प्रजातीतील आहे. उत्तरेकडील ईशान्य भागात कुरिल आणि सखालिन द्वीपकल्पातही ते आढळतात. ते परिस्थितीशी जुळवून घेत अन्नस्रोतांच्या विविध भागात टिकून राहतात. त्यामुळे ते नवीन भागांमध्ये वसाहत करण्यास तयार होतात जोहान जार्ज वॅग्लर ने प्रथम इ.स. १८२७ साली अशाच नमुन्याच्या एका प्रजातींचे वर्णन केले. मॅक्रोऱ्हिन्चॉस इंटरनेट बर्ड कलेक्शन पूर्वेच्या जंगलातील कावळा आणि भारतीय जंगल कावळा समान मानले जातात. या दोघांनाहीत जंगल कावळा म्हटले जाते.

 
Large-billed Crow (14570591431)
 
Large billed crow
 
Corvus macrorhynchos

वर्णन संपादन

ह्या कावळ्याची एकूण लांबी ४६ ते ५९ सें.मी इतकी आहे. गळपट्टा सामान्य कावळ्यापेक्षा थोडा मोठा असतो. सर्व कावळ्यांच्या तुलनेत या लार्ज बिल्ड कावळ्याची चोच फार मोठी आणि धनुष्याकार असून वरच्या बाजूला असते, त्यांचे पंख, शेपटी, चेहरा आणि कंठ चमकदार काळे असतात. डोके, मान, खांदा निळे असून शरीराच्या मागच्या भागावर गडद किंचाळयुक्त पिसारा असतो.


हे सुद्धा पहा संपादन