डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी

इ.स. १९१९ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दलित-मुक्तीच्या चळवळीला सुरुवात झाली. इ.स. १९२० साली 'मूकनायक' हे वृत्तपत्र सुरू केले तेव्हा ते दलित जनतेचे पुढारी म्हणून ओळखले जाऊ लागले होते. दलित-मुक्तीच्या या चळवळीत डॉ. आंबेडकरांना अनेक निष्ठावंत सहकारी लाभले. या सहकाऱ्यांत सवर्णदेखील होते. या सर्व सहकाऱ्यांचे या चळवळीतले योगदान महत्त्वाचे आहे. मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता, प्रबुद्ध भारत या नियतकालिकांच्या संपादन - प्रकाशनाच्या संदर्भात; बहिष्कृत हितकारिणी सभा, समाज समता संघ, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन या संघनांच्या उभारणीत; महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह; नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह, अशा तऱ्हेच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत डॉ. आंबेडकरांचे हे सहकारी सहभागी झाले होते. ते केवळ महाराष्ट्रातील होते असे नाही, तर भारताच्या वेगवेगळ्या भागांत ते विखुरलेले होते. त्यांच्या सहकार्यामुळे, विविध संघटनांतील त्यांच्या कार्यामुळे आंबेडकरी चळवळ देशभर पसरली, अशा अनेक सहकाऱ्यांपैकी काहींची नावे खाली दिलेली आहेत.[१]

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी' हे योगीराज बागूल यांनी लिहिलेले पुस्तक असून यात ९ व्यक्तींचा समावेश आहे. या ग्रंथाचे प्रकाशन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले आहे.[२][३][४][५]

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दादासाहेब गायकवाडांना पत्रे, संपादक - वामन निंबाळकर
  2. ^ "योगीराज बागुल लिखित 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी' या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०१५ | Granthali". 2019-10-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-03-31 रोजी पाहिले.
  3. ^ "आठवणीतले अज्ञात बाबासाहेब!". Maharashtra Times.
  4. ^ "डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी-Dr. Babasaheb Ambedkar ani Tynche Dalitetar Sahakari by Yogiraj Bagul - Granthali - BookGanga.com". www.bookganga.com.
  5. ^ Gaikwad, Priyanka. "'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी' ग्रंथाचे आज प्रकाशन |". 2023-10-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-03-31 रोजी पाहिले.