डॉन फ्रेझर
ऑस्ट्रेलियन जलतरणपटू आणि राजकारणी
डॉन फ्रेझर (४ सप्टेंबर, इ.स. १९३७ - हयात) ही एक ऑस्ट्रेलियन जलतरणपटू आहे.
कारकीर्द
संपादनफ्रेझरने १९५६ उन्हाळी ऑलिंपिक, १९६० उन्हाळी ऑलिंपिक व १९६४ उन्हाळी ऑलिंपिक अशा लागोपाठ तीन ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १०० मीटर फ्रीस्टाईल पोहण्याच्या शर्यतीत सुवर्णपदके मिळविली. असा मान मिळविणारी ती पहिली जलतरणपटू आहे. कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धांमध्ये तिने सहा सुवर्णपदके मिळविली. आपल्या कारकिर्दीत तिने एकूण २७ जागतिक विक्रम मोडले. इ.स. १९६४ मध्ये फ्रीस्टाईल प्रकारात १०० मीटर अंतर एका मिनिटाच्या आत पोहून जाणारी ती पहिली जलतरणपटू ठरली. हे अंतर तिने त्यावेळी ५९.५ सेकंदात पार केले.