डेन्मार्कचा चौथा एरिक

चौथा एरिक (इ.स. १२१६ - ऑगस्ट ९, इ.स. १२५०) हा डेन्मार्कचा राजा होता. इ.स. १२४१पासून ते मृत्यूपर्यंत तो गादीवर होता.

डेन्मार्कचा दुसरा वाल्देमारपोर्तुगालची बेरेंगारिया यांचा मुलगा असलेला एरिक, हा एबेल आणि पहिल्या क्रिस्टोफरचा भाऊ होता. याला एरिक प्लाउपेनी या नावानेही ओळखले जाते.