डॅलहार्ट हे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील डॅलाम काउंटीहार्टली काउंटीत वसलेले गाव आहे. डॅलाम काउंटीचे प्रशासकीय केंद्र असलेले हे गाव इ.स. १९०१मध्ये वसवले गेले. २०००च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७,२३७ आहे. हे गाव यु.एस. हायवे ८७, यु.एस. हायवे ३८५ आणि यु.एस. हायवे ५४च्या तिठ्यावर आहे.

रिता ब्लांका लेक राज्योद्यान येथून दोन मैल दक्षिणेस आहे.

अर्थव्यवस्थासंपादन करा

येथील अर्थव्यवस्था मुख्यत्वे शेतीप्रधान आणि पशुपालनाधारित आहे. येथे गायी व डुकरांची पैदास होते तसेच चीझ तयार करण्याचा कारखानाही आहे. याशिवाय डॅलहार्टमध्ये तुरुंग आहे.


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.