डी.टी.पी.
संगणकाचा वापर करून मेजावरच (टेबलवर) करण्यात येणारी छपाई वा प्रकाशन यास डेस्क टॉप पब्लिशिंग (डी.टी.पी.) म्हणतात.
डेस्कटॉप प्रकाशनाचा उपयोग लहानमोठ्या प्रमाणावर पुस्तकाची छपाई करण्यासाठी होतो. त्यासाठी एक वैयक्तिक संगणक आणि त्यावर WYSIWYG पृष्ठ लेआउट सॉफ्टवेर लागते.. डेस्कटॉप प्रकाशन पद्धती ही वर्ड प्रोसेसिंगपेक्षा डिझाईन व लेआउट या बाबतीत आणि टायपोग्राफीपेक्षा अधिक नियंत्रित असते.
सामान्यत:पुस्तक प्रकाशनासाठी वापरले जाणारे समान डीटीपी कौशल्य आणि सॉफ्टवेर हे कधीकधी वस्तूच्या तिथल्या तिथे विक्रीसाठी, वस्तूच्या जाहिरातीसाठी, व्यावसायिक विक्रय प्रदर्शनांमध्ये, किरकोळ पॅकेज डिझाईन्ससाठी आणि बाह्य चिन्हे यांसाठीचे ग्राफिक्स तयार करण्यासाठी वापरले जाते.. जरी "डीटीपी सॉफ्टवेर" म्हणून वर्गीकृत केलेले असले तरीही ते मुद्रण आणि पीडीएफ प्रकाशनांपर्यंतच मर्यादित आहे. तरीही डेस्कटॉप प्रकाशकांद्वारे उत्पादित केलेली सामग्री निर्यात आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांसाठी वापरली जाऊ शकते. ई-पुस्तके, वेब सामग्री, आणि वेब पृष्ठे तयार करण्यासाठी "डीटीपी" वापरता येते. डीटीपीमध्ये प्रावीण्य मिळवून कोणताही ग्राफिकल वापरकर्ता इंटरफेससाठी वेब डिझाइन बनवू शकतो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |