दियेगो गार्सिया
(डिएगो गार्सिया या पानावरून पुनर्निर्देशित)
डियेगो गार्सिया हिंदी महासागरातील छोटे प्रवाळबेट आहे. चागोस द्वीपसमूहाच्या ६० बेटांमधील सगळ्यात मोठे असलेले हे बेट ब्रिटिश हिंदी महासागर क्षेत्र या युनायटेड किंग्डमधार्जिण्या प्रदेशाची राजधानी आहे.
या बेटावर फ्रेंचांनी १७९०मध्ये पहिल्यांदा कायमस्वरुपी वस्ती केली व नंतर ते ब्रिटिशांना हस्तांतरित केले. त्यावेळी मॉरिशसचा एक भाग असलेले हे बेट व आसपासचा प्रदेश १९६५मध्ये वेगळ्या प्रदेशात घालण्यात आला. १९६८ ते १९७३ दरम्यान युनायटेड किंग्डमने येथील स्थानिक रहिवाशांना मॉरिशस आणि सेशेल्स येथे हाकलून दिले. त्यानंतर अमेरिकेने येथे लश्करी तळ उभारला.