ठोसेघर धबधबा

भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच धबधबा


पर्यटकांचे मुख्य आकर्षण असणारा ठोसेघर धबधबा दरवर्षी जून-जुलै महिन्यात सुरू होतो शुभ्र पाणी अती उंचावरून वाहते. परंतु सन २०११ मध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे या धबधब्याचे तांडवनृत्य जरा लवकरच सुरू झाले होते. त्यामुळे त्यावर्षी उन्हाने हैराण झालेल्या पर्यटकांनी अंगावर रोमांच उभे करणाऱ्या धबधब्याचा जलौघ पाहण्यासाठी ठोसेघरकडे मोठ्या संख्येने धाव घेतली होती.

ठोसेघर धबधबा

हा धबधबा तारळी नदीवर आहे. 150 ते 180 मी.उंचीवर वाहणारा हा धबधबा पश्चिम घाटामधील निसर्गाचा एक मोठा अविष्कार आहे या ठिकाणी 3 धबधबे आहेत एक मुख्य आणि त्या लगतच एक छोटा 3रा धबधबा या 2 पासून थोडा लांब वाहतो धबधब्याच्या जवळचे गाव ठोसेघर आहे. ठोसेघरच्या तसेच पुढे गेल्यावर चाळकेवाडी हे गाव आहे.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पवनचक्की पासून वीज निर्मिती केली जाते चाळकेवाडीचे पठार सुद्धा पाहण्या सारखे आहे,

जाण्यासाठी रेल्वेने महाराष्ट्रातल्या सातारा स्टेशनवर उतरून, बसने ठोसेघर गावी पोहोचावे.

संदर्भ

संपादन