ठेचा हा महाराष्ट्रातील एक खाद्यपदार्थ आहे. अतितिखट हिरव्या मिरच्या ठेचून जी चटणी बनते तिला (मिरच्यांचा) ठेचा म्हणतात. हा नेहमीच्या दाणे-खोबरे घालून केलेल्या चटण्यांपेक्षा खूप अधिक तिखट असतो, त्यामुळे बेताबातानेच चाखावा लागतो.