टोबी मॅग्वायर
टोबियास व्हिन्सेंट टोबी मॅग्वायर (२७ जून, १९७५:सांता मोनिका, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) हा अमेरिकेचा चित्रपट अभिनेता आणि निर्माता आहे. याने १४व्या वर्षी चित्रपटांतून अभिनय करण्यास सुरुवात केली होती. मॅग्वायरने २००२, २००४ आणि २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या स्पायडरमॅन चित्रपटशृंखलेमध्ये नायकाचे काम केले होते. याशिवाय त्याने प्लेझंटव्हिल, वंडर बॉइझ, सीबिस्किट आणि द ग्रेट गॅट्सबी सह अनेक चित्रपटांतून अभिनय केला आहे.