टोनी तान केंग याम
टोनी तान केंग याम (सोपी चिनी लिपी: 陈庆炎 ; पारंपरिक चिनी लिपी: 陳慶炎 ; फीनयीन: Chén Qìngyán ; सिंगापुरी रोमनीकरण: Tony Tan Keng Yam ;) (७ फेब्रुवारी, इ.स. १९४०; सिंगापूर - हयात) हा सिंगापुरी राजकारणी, बँकर व गणिती असून सिंगापुराचा विद्यमान ७वा राष्ट्राध्यक्ष आहे. १ सप्टेंबर, इ.स. २०११ रोजी त्याने अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. त्याआधी १ जुलै, इ.स. २०११ पर्यंत तो गव्हर्मेंट ऑफ सिंगापूर इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन (जीआयसी) या संस्थेचा कार्यकारी संचालक व उप-पदाधिकारी होता, तर सिंगापूर प्रेस होल्डिंग्ज लिमिटेड (एसपीएच) या संस्थेचा पदाधिकारी होता. इ.स. १९९५ ते इ.स. २००५ या कालखंडात तो सिंगापुराचा उपपंतप्रधान होता.
ऑगस्ट, इ.स. २०११ मध्ये झालेल्या सिंगापुराच्या अध्यक्षीय निवडणुकींमध्ये तान उभा राहिला होता[१] व ०.३५% एवढ्या निसटत्या फरकाने जिंकला. १ सप्टेंबर, इ.स. रोजी त्याने सिंगापुराचा ७वा अध्यक्ष म्हणून शपथ घेतली[२].
संदर्भ
संपादन- ^ "टोनी तान टू रन फॉर प्रेसिंडेंट (टोनी तान अध्यक्षपदासाठी उभे राहणार)" (इंग्लिश भाषेत). 2011-09-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-08-30 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "टोनी तान इलेक्टेड अॅज सिंगापोर्स सेवन्थ प्रेसिंडेंट (टोनी तान सिंगापुराचा ७वा अध्यक्ष म्हणून निवडला गेला)[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (इंग्लिश भाषेत). 2012-10-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-08-30 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे
संपादन- "अधिकॄत चरित्र" (इंग्लिश भाषेत). 2013-09-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-09-05 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |