टिळक स्मारक मंदिर

लोकमान्य टिळकांच्या स्मरणार्थ पुणे शहरात बांधलेली वास्तू
(टिळक स्मारक रंग मंदिर या पानावरून पुनर्निर्देशित)

टिळक स्मारक मंदिर ही लोकमान्य टिळकांच्या स्मरणार्थ पुणे शहरात बांधलेली वास्तू आहे. पुण्यातील टिळक रस्त्यावर ही वास्तू उभी आहे. टिळक स्मारक मंदिर म्हणजे पुण्यातील राजकीय, धार्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक चळवळीचे माहेरघराच आहे.

प्रकल्प

संपादन

टिळक स्मारक मंदिराच्या प्रकल्पात खालील गोष्टींचा समावेश आहे:

  • सेमिनार कक्ष (तळमजला)
  • प्रेक्षागृह (पहिला मजला) - ९०१ आसनी. प्रेक्षागृहात गोपाळ देऊसकर यांनी तयार केलेल्या भित्तिचित्रांची मालिका आहे, जी लोकमान्य टिळकांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना दर्शवते.[][]

इतिहास

संपादन

लोकमान्य टिळकांच्या स्मरणार्थ हे स्मारक उभारण्यात आले. स्मारकाचे बांधकाम १९७२-१९७६ सालांदरम्यान पुरे झाले. बांधकामास सुमारे ४५ लाख रुपये खर्च आला. गोपाळराव देऊसकरांनी घडवलेला टिळकांचा पुतळा आणि रंगवलेली भित्तिचित्रे हे या स्मारकाचे वैशिष्ट्य आहे. टिळक महाविद्यालय , वैदिक संशोधन मंडळ, काँग्रेस स्वराज्य पक्ष, लोकशाही स्वराज्य पक्ष(स्त्री शाखा), आशा अनेक संस्थांना मंदिराने जागा वापरण्यास दिली. वसंतव्याख्यानमालेचे वासंतिक ज्ञानसत्र सन १९३३ ते १९५६ या कालावधीत मंदिराच्या आवारात भरत असे. याच काळात महात्मा गांधी, मनमोहन मालवीय, भाई परमानंद, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, आशा विख्यात व्यक्तींनी मंदिरास भेटी दिल्या आहेत.जुन्या टिळक स्मारक मंदिराची जागा लोकमान्य टिळकांचे मानसपुत्र सरदार जगन्नाथ महाराज पंडितांनी लोकमान्यांच्या स्मरणार्थ त्यांचे ध्येय धोरणाला अनुसरून कृत्य करण्यासाठी बक्षीस पत्रकाने दिली. १ ऑगस्ट१९३७ रोजी मंदिरासमोरील ८९६०चौ. फूट जागा जगन्नाथ महाराज पंडित यांच्या कडून विकत घेतली. सन १९५८ मध्ये लोकमान्यांचे नातू आणि केसरीचे संपादक विश्वस्त श्री. जयंतराव टिळक हे मंदिराचे अध्यक्ष झाले. सन १९७५ मध्ये चित्रकार गोपाळ देऊस्कर यांनी लोकमान्यांचा पूर्णाकृती पुतळा भिंतीवर उभारला आहे. या नूतन वस्तूसाठी अंदाजे ३० लक्ष रुपये एवढा खर्च झाला.

संदर्भ

संपादन
  1. ^ "कलासंघ व चित्रकार : महाराष्ट्रातील प्रमुख कलासंघ". Maharashtra Navnirman Sena. 2015-07-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 15 July 2015 रोजी पाहिले.
  2. ^ Bahulkar, Suhas. चित्रकार गोपाळ देऊसकर. Ranjhans Prakashan. ISBN 9788174348500. 15 July 2015 रोजी पाहिले.