झुलू विकिपीडिया
झुलू विकिपीडिया ही विकिपीडियाची झुलू भाषेतील आवृत्ती आहे. नोव्हेंबर २००३ मध्ये या आवृत्तीचा आरंभ झाला होता आणि १३ मे २००९ पर्यंत यातली लेखसंस्ख्या १८६ लेखांवर पोहोचली आणि २५ एप्रिल २०१६ रोजी हा आकडा ७६६ वर पोचला, ज्यामुळे ही लेखसंख्येनुसार २४७वी सर्वात मोठी विकिपीडिया आवृत्ती (मागील तारखेच्या २२१ व्या क्रमांकावरून खाली) बनली.[१] एप्रिल २०२१ मध्ये यात ८,०१५ लेख आणि २३ सक्रिय नोंदणीकृत वापरकर्ते होते.
झुलू विकिपीडियाचे संस्थाचिन्ह | |
ब्रीदवाक्य | मुक्त ज्ञानकोश |
---|---|
प्रकार | ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प |
उपलब्ध भाषा | झुलू |
मालक | विकिमीडिया फाउंडेशन |
निर्मिती | जिमी वेल्स, लॅरी सॅंगर |
दुवा | http://zu.wikipedia.org/ |
व्यावसायिक? | चॅरिटेबल |
नोंदणीकरण | वैकल्पिक |
अनावरण | नोव्हेंबर, इ.स. २००३ |
आशय परवाना | क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.० |
इतिहास
संपादनजरी १०० लेखांपर्यंत पोहोचण्याची ती तिसऱ्या क्रमांकाची आफ्रिकी भाषेची विकिपीडिया होती,[२] तरीही प्रगती मंद आहे, आणि इतर अनेक आफ्रिकी भाषांनी त्यास मागे टाकले आहे.
दोन्हीही न्गुनी भाषा असून, झुलू बहुतेकपणे कौसाशी परस्पर सुबोध आहे, म्हणून कौसा विकिपीडियासाठी झुलू आवृत्तीतील लेख सहजपणे कौसा मध्ये भाषांतरित करणे शक्य आहे. विकिमिडियाच्या स्कॅनविकि सहयोग साधनाद्वारे स्वीडिश, नॉर्वेजियन आणि डॅनिश सारख्या स्कँडिनेव्हियन भाषेच्या आवृत्तीसाठी अंतर-विकीचे समान प्रयत्न केले गेले आहेत.
जानेवारी २०१२ मध्ये, झुलु विकिपीडिया बंद करण्याचा प्रस्ताव होता. मार्च २०१२ मध्ये हा प्रस्ताव नाकारला गेला.[३]
हे सुद्धा पहा
संपादनसंदर्भ
संपादन- ^ List of Wikipedias
- ^ "IOL SciTech". 2008-01-15 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-05-13 रोजी पाहिले.
- ^ Proposals for closing projects/Closure of Zulu Wikipedia
बाह्य दुवे
संपादन- (झुलू भाषेत) झुलु विकिपीडिया
- (झुलू भाषेत) झुलु विकिपीडिया मोबाइल आवृत्ती (पूर्ण समर्थित नाही)
- एरिक झॅक्टे यांनी झुलु विकिपीडियाची आकडेवारी