झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२१-२२
झिम्बाब्वे क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी जानेवारी २०२२ दरम्यान श्रीलंकेचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळविण्यात आली. सर्व सामने कँडी मधील पलेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान येथे खेळविण्यात आले.
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०२१-२२ | |||||
श्रीलंका | झिम्बाब्वे | ||||
तारीख | १६ – २१ जानेवारी २०२२ | ||||
संघनायक | दासून शनाका | क्रेग अर्व्हाइन | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | श्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | चरिथ असलंका (१४६) पथुम निसंका (१४६) |
शॉन विल्यम्स (१५४) | |||
सर्वाधिक बळी | जेफ्री व्हँडर्से (९) | रिचर्ड नगारावा (६) | |||
मालिकावीर | पथुम निसंका (श्रीलंका) |
मूलत: सदर मालिका ऑक्टोबर २०२० मध्ये होणार होती. परंतु काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली. शेवटी मालिका जानेवारी मध्ये खेळवली जाईल असे श्रीलंका क्रिकेट बोर्डातर्फे नोव्हेंबरच्या शेवटाला स्पष्ट करण्यात आले. मूळ वेळापत्रकात असलेले दोन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने वेळ वाचावा म्हणून खेळविण्यात आले नाहीत. श्रीलंकेने मालिका २-१ ने जिंकली.
२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
संपादन१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
- चमिका गुणसेकरा (श्री) आणि टाकुद्ज्वानाशी कैतानो (झि) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक सुपर लीग गुण : श्रीलंका - १०, झिम्बाब्वे - ०.
२रा सामना
संपादन