ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती
ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधन ही ज्ञान प्रबोधिनीची महिला संघटना आहे
स्वरूप
संपादनशहरी व ग्रामीण भागात स्त्रियांच्या संघटनेचे काम ज्ञान प्रबोधिनी 'स्त्री शक्ती प्रबोधन' या नावाने करते. शहरी गटात ‘संवादिनी’ या नावाने चालते तर ग्रामिण भागात स्त्री शक्ती प्रबोधन (ग्रामीण) अशा नावाने काम चालते
कार्य
संपादनग्रामीण भागातील काम एप्रिल १९९५ पासून सुरू झाले तर शहरी काम जून १९९८ पासून सुरू झाले. २०११ पासून चालू झालेले हे काम स्त्री शक्ती प्रबोधन या नावाने वेगळा विभाग करून चालवले जाते.
ग्रामीण: किशोरी, युवती, नवमाता व महिला या चार गटात स्थानिक नेतृत्व उभे करण्यासाठी काम केले जाते. यामध्ये त्यांचा आत्मविश्वास वाढवला जातो. कौशल्य विकास, स्वयंरोजगार, आरोग्य, नेतृत्व या कामाच्या दिशा आहेत. या शिवाय ४५ गावातील ५२०० ग्रामीण महिलांसाठी ३०० बचत गट चालवले जातात.
आदर्श
संपादनभगिनी निवेदिता, राजमाता जिजाबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या ज्ञान प्रबोधिनी स्त्री शक्ती प्रबोधनच्या आदर्श आहेत.
पुस्तके
संपादनपुस्तके (ग्रामीण संदर्भात)
संपादन- आम्ही बि घडलो तुम्ही बि घडाना (बचत गट अनुभव), २०००
- केल्याने होत आहे रे (यशस्वी स्वयंरोजगार करणाऱ्यांचे अनुभव) २००२
- प्रेरीका अभ्यासक्रम (यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रम पुस्तक लेखन)२००४
- बचत गटासाठी कार्यक्षम व्यवस्थापन पुस्तिका २००७ (नाबार्ड अनुदानित)
- स्त्री शक्तीच्या पाउल वाटा
- बँकेत पाऊल टाकण्यापूर्वी
पुस्तके (शहरी गट)
संपादन- 'समतोल' हे मासिक संवादिनीच्या वतीने दर २ महिन्यांनी प्रकाशित केले जाते.
- तिच्या डायरीची पाने
- स्त्री शक्ती प्रबोधन संकल्पना पुस्तिका