जोशी-अभ्यंकर हत्याकांड
जोशी-अभ्यंकर हत्याकांड ३१ ऑक्टोबर १९७६ रोजी पुण्यात घडले. राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप आणि मुनव्वर शाह ह्या चार तरुणांनी हे हत्याकांड घडवून आणले. मुनव्वर शहाने कैदेत असताना यस आय एम गिल्टी नावाचे एक आत्मचरित्र लिहिले.[ संदर्भ हवा ]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
पुणे शहर हे इतर शहरांच्या तुलनेत शांत आणि सुरक्षित शहर म्हणून ओळखले जात असे. मात्र १९७६ मध्ये घडलेल्या जोशी-अभ्यंकर कुटुंबांच्या निर्घृण हत्याकांडाने या लौकिकास प्रथमच तडा गेला. बराच काळ या प्रकरणाचा गुंता उलगडत नव्हता. त्या काळात प्रत्येकाच्या तोंडी याच घटनेची चर्चा होती. साऱ्या शहरात यामुळे घबराट उडाल्यामुळे सायंकाळनंतर त्या काळी शहरात सामसूम होत असे, असे अनेक जण सांगतात. अखेर पोलिसांनी हा गुंता उलगडला, आणि राजेंद्र जक्कल, दिलीप सुतार, शांताराम जगताप आणि मुनव्वर शाह या चौघांना २५ ऑक्टोबर१९८३ रोजी फाशी देण्यात आली. जोशी आणि अभ्यंकर कुटुंबांचे बंगले, बेलबाग चौकातील जक्कल स्टुडिओ, कर्वे रस्ता परिसरातील या चौकडीची टपरी, हॉटेल विश्व, सारसबाग-पेशवे उद्यान या परिसरातून जाताना जुन्या पिढीतील पुणेकरांना ही घटना आजही आठवते. निष्पाप नागरिकांचे आणि महिला-मुलांचे बळी घेण्याच्या या क्रूर हत्याकांडामुळे पुणेकर हादरून गेले होते.