जॉर्ज रीड किंवा सर जॉर्ज होस्टन रिड (२५ फेब्रुवारी १८४५ - १२ सप्टेंबर १९१८) हा १९०४ पासून १९०५ पर्यंत ऑस्ट्रेलियाचा चौथा पंतप्रधान होता. त्याने रिड सरकारचे नेतृत्व केले.१८९४ ते १८९९ या दरम्यान,ऑस्ट्रेलियन राजकारणी म्हणून न्यू साउथ वेल्सचा तो प्रीमियर होता. सन १८९१ पासून १९०८ या दरम्यान त्याने फ्री ट्रेड पार्टीचे नेतृत्व केले.

रेडचा जन्म जॉनस्टोन, रेनफ्रूशशायर, स्कॉटलंड येथे झाला. तो व त्याचे कुटुंब, तो लहान असताना ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले. ते प्रारंभी मेलबर्न येथे स्थायिक झाले पण रिड १३ वर्षांचा असतांना ते सिडनी येथे गेले. त्याने शाळेत जाणे सोडले आणि लिपिक म्हणून जीवनाची सुरुवात केली. तो नंतर न्यू साउथ वेल्स नागरी सेवेत सामील झाला. त्याने १८७६ मध्ये कायद्याचा अभ्यास सुरू केला व कायदा बारमध्ये सन १८७९ला दाखल झाला. १८८० मध्ये त्याने न्यू साउथ वेल्स विधानसभा निवडणूक जिंकून संसद चालविण्यासाठी नागरी सेवेतुन राजीनामा दिला .