जॉय मुखर्जी (२४ फेब्रुवारी, इ.स. १९३९; झाशी, ब्रिटिश भारत - ९ मार्च, इ.स. २०१२; मुंबई, महाराष्ट्र) हा बंगाली-भारतीय चित्रपट अभिनेता व दिग्दर्शक होता.

इ.स. १९६० साली प्रदर्शित झालेल्या लव्ह इन सिमला या चित्रपटातील मुख्य नायकाच्या भूमिकेतून याने चित्रपटक्षेत्रात प्रवेश केला. फिर वोही दिल लाया हूं, लव्ह इन टोक्योजिद्दी हे याचे गाजलेले चित्रपट होत.

कौटुंबिक पार्श्वभूमी

संपादन

जॉय मुखर्जी हिंदी चित्रपट निर्माते शशधर मुखर्जी व त्यांची पत्नी सतीदेवी यांचा पुत्र होता. शशधर मुखर्जी फिल्मालय स्टुडिओज् या ख्यातनाम हिंदी चित्रपटनिर्मिती कंपनीचे सहसंस्थापक होत. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक सुबोध मुखर्जी हे जॉय मुखर्जीचे काका, तर अशोककुमार, किशोरकुमार हे त्याचे मामा होत.

मृत्यू

संपादन

आयुष्याच्या अखेरच्या काळात जॉय मुखर्जीची फुप्फुसे निकामी झाली होती. उपचारांसाठी मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलात ठेवले असताना ९ मार्च, इ.स. २०१२ रोजी त्याचे निधन झाले[][][].

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ "अभिनेता जॉय मुखर्जी यांचे निधन[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". ११ मार्च, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)
  2. ^ "जॉय मुखर्जी यांचे निधन". 2016-03-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ मार्च, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ "चित्रपट निर्माते जॉय मुखर्जी यांचे निधन". 2012-03-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ मार्च, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे

संपादन