जॉन लॉरेन्स गोहेन (जन्म- डिसेंबर १०, १८८३ - मृत्यू- फेब्रुवारी ३, १९४८) कोल्हापूरात जन्मलेले हे एक अमेरिकन मिशनरी, शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक, प्रशासक, शेतकरी आणि लेखक होते. त्यांनी १९३९ साली बॉम्बे लिट्रेसी मोहिमेद्वारे साक्षरता अभियानात मोठा वाटा उचलला. त्यांनी "प्रत्येक घर साक्षर गृह" हा नारा देऊन भारतातील विविध भागांमध्ये प्रौढ शिक्षण संघटना स्थापन केल्या. त्यांनी साक्षरतेच्या प्रसारासाठी धार्मिक संस्थाना प्रोत्साहीत केले.

जॉन लॉरेन्स गोहेन

जीवनपट

संपादन

गोहेन यांचा जन्म कोल्हापूर येथे १० डिसेंबर १८८३ रोजी झाला. त्यांचे पालक अमेरिकेन प्रेस्बिटेरियन मिशनरी होते. ते सात वर्षांचे असताना त्याच्या पालकांनी त्यांना अमेरिकेत शिक्षणासाठी वॉस्टर ओहायोला पाठवले. १९०२ मध्ये त्यांनी वूस्टर अकादमी व १९०६ मध्ये वूस्टर विद्यापीठातून पदवी प्राप्त केली.

१९२० ते १९२१ पर्यंत त्यांनी कॅलिफोर्नियातील डेव्हिस येथील राज्य कृषी महाविद्यालयाच्या कृषी विषयाच्या विशेष अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. ते ओपेनिडॅल कॉलेज आणि फ्रॅंकलिन कॉलेजमधील शारीरिक शिक्षणाचे संचालक ही होते, आणि क्लीव्हलॅंड, ओहियोमधील एका उच्च शाळेत ॲथलेटिक दिग्दर्शक म्हणूनही काम केले. १९०८ साली त्यांनी जेन लेआ कॉर्बेटशी विवाह केला. जेनचा जन्म १८८६ मध्ये वॉशिंगटनच्या टॅकोमा येथे झाला होत. तिने चीनच्या चेफू येथे प्राथमिक शिक्षणास सुरुवात केली जिथे तिचे वडील हंटर कॉर्बेट अमेरिकेचे एक मिशनरी म्हणून सेवा करत होते.

१९१० मध्ये जॉन आणि जेन गोहिन यांची अमेरिकन प्रेस्बिटेरियन मिशनऱ्यां मधून पश्चिम भारतातील सांगलीमध्ये मिशनरी सेवेसाठी नियुक्ती झाली. गोहेन्स दापत्य १९११ साली भारतात आले आणि त्यांनी सांगली येथील बॉयस् शाळेत मुख्याध्यापक म्हणून पदभार घेतला. त्यांनी शाळेचे औद्योगिक व कृषी शैक्षणिक शिक्षण संस्थानांत रूपांतर करून त्या शाळेचे सांगली मुवेबल स्कुल आसे नामांतर व विस्तार केला. यामुळे सांगलीच्या आसपासच्या गावांना सुधारित शेतीची साधने मिळाली.

त्यांची बॉम्बे लिटरेसी मिशनचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आली. त्यांनी वेस्ट इंडियन मिशन ऑफ अमेरिकन प्रेस्बिटेरियन मिशनरीचे कार्यकारी सचिव म्हणून दीर्घकालीन सेवा दिली.

इचलकरंजीचे प्रशासक

संपादन

इचलकरंजी संस्थानाचे संस्थानिक बाबासाहेब घोरपडे ह्यांनी १९३० साली युरोपला जाताना गोहेन यांना इचलकरंजी राज्याचा प्रशासक होण्याची विनंती केली. गोहिन यांनी ती विनंती मान्य केली आणि ब्रिटिश भारतातील तत्कालीन बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये इचलकरंजी संस्थानाची प्रशासक पदाची सूत्रे स्वीकारली. १९३० ते १९३४ सालापर्यंत त्यांनी इचलकरंजी संस्थानाच्या प्रशासकपदी काम केले. इचलकरंजी संस्थानाचा सुमारे ८० गावे असलेला प्रांत, इचलकरंजी शहर व त्या वर संस्थानिकांचे प्रशासन, या विषयावर 'ग्लिम्प्सस ऑफ इचलकरंजी' नावाचे एक इंग्रजी पुस्तक त्यांनी लिहिले.

अलाहाबाद एग्रिकल्चरल इंस्टिट्यूट

संपादन

१९४४ साली, गोहेन अलाहाबाद येथील भारतातील सर्वात जुने कृषी शिक्षण संस्था असलेल्या ऍग्रीकल्चरल इन्स्टिट्यूटचे प्राचार्य झाले.

सप्टेंबर १९४७ मध्ये गोहेन वैद्यकीय उपचारांसाठी न्यू यॉर्कला गेले. तेथे त्यांचे वयाच्या ६४ व्या वर्षी ३ फेब्रुवारी १९४८ रोजी निधन झाले. त्यांच्या हस्तलिखिते, छायाचित्रे आणि पत्रव्यवहार यांचा संग्रह फिलाडेल्फियातील प्रेस्बायटेरियन हिस्टोरिकल सोसायटीमध्ये ठेवण्यात आला आहे.

गोहिन यांची अलाहाबाद ऍग्रिकल्चरल इंस्टीट्युटमध्ये नियुक्ती झाल्यानंतर, त्यांच्या पत्नी जेन गोहिन यांनी गृह अर्थशास्त्राच्या शाळेत शिकवले जिथे ख्रिश्चन मुलींना भारतातील स्त्रियांना शिकवण्याकरिता प्रशिक्षित केले जात होते. काही वर्षांच्या सेवे दरम्यान, त्यांनी कोल्हापूर आणि आसपासच्या गावातील स्त्रियांबरोबर चर्चच्या कार्यासाठी काम केले. १९५२ साली त्या निवृत्त झाल्या. १९७७ साली त्यांचे निधन झाले.[]

संदर्भ

संपादन