जॉन चर्चिल पहिला मार्लबोरो
जॉन चर्चिल (१६५० ते १७२२) इंग्लंडच्या इतिहासातील एक प्रभावी सेनापती होता. त्याला मार्लबोरो या नावानेही ओळखले जाते. इंग्लंडचे दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील पंतप्रधान विन्स्टन चर्चिल हे जॉन चर्चिल यांच्याच वंशातील होत. चर्चिलने आपल्या कारकिर्दीत इंग्लंडमधील अनेक राजांचा उदय व अस्त पाहिला. त्याने लष्करात आपला हुद्दा वाढवण्यासाठी- टिकवण्यासाठी तसेच राजकारणात प्रभाव राखण्यासाठी अनेकदा बऱ्या वाईट कृत्याचा वापर केला. परंतु युद्धभूमीवरील त्याचे शौर्य, युद्ध जिंकण्यासाठी त्याच्या कडे असलेले नैसर्गिक कसब यांमुळे इंग्रज सेनेला त्याने युरोपमध्ये दरारा मिळवून दिला. आज मार्लबोरोची गणना इंग्लंडच्या महान सेनापतींमध्ये होते.