जॉन आर्जिरोपूलस
(जॉन आर्गिरोपूलस या पानावरून पुनर्निर्देशित)
जॉन आर्जिरोपूलस ( /ɑːrdʒɪˈrɒpələs/ ; ग्रीक: आयोनिस अर्जिरोपूलस; इटालियन: जियोव्हानी आर्जिरोपुलो; १४१५ - २६ जून, १४८७) हे मध्युयुगातील एक विद्वान, तत्त्वज्ञानी आणि मानवतावादी होते. हे १५व्या शतकातील इटलीतील शास्त्रीय ग्रीक शिक्षणाच्या पुनरुज्जीवनात अग्रगण्य असलेल्या ग्रीक विद्वानांपैकी एक होते. [१]
त्यांनी ग्रीक तात्विक आणि धर्मशास्त्रीय कार्यांचे लॅटिनमध्ये भाषांतर केले आणि स्वतःचेही धर्मशास्त्रीय लेखन केले. आर्जिरोपूलस १४३९-४४ दरम्यान फिरेंझेची समिती या धार्मिक सभेचे सदस्य होते. कॉन्स्टँटिनोपलच्या पतनानंतर हे इटलीला परतले. त्यानंतर ते १४५६-१४७० दरम्यान फिरेंझे तर १४७१-१४८७ दरम्यान रोममध्ये शिक्षक होते.
संदर्भ
संपादन- ^ "John Argyropoulos". www.britannica.com. 2009-10-02 रोजी पाहिले.
John Argyropoulos Byzantine educator born 1415, Constantinople [now Istanbul, Turkey] died June 26, 1487, Rome, Papal States [Italy] Byzantine humanist and active promoter of the revival of Classical learning in the West.