जेम्स दुसरा, स्कॉटलंड

जेम्स दुसरा (१६ ऑक्टोबर, इ.स. १४३० - ३ ऑगस्ट, इ.स. १४६०) हा १४३७ ते मृत्यूपर्यंत स्कॉटलंडचा राजा होता. हा जेम्स पहिला आणि जोन बोफोर्टचा मुलगा होता. जेम्स पहिल्याची २१ फेब्रुवारी, इ.स. १४३७ रोजी हत्या झाल्यावर दुसरा जेम्स राजेपदी आला.

जेम्स दुसरा आणि ग्वेल्डर्सची मेरी यांना सात मुले झाली. त्यांपैकी जेम्स तिसरा हा याच्यापश्चात स्कॉटलंडचा राजा झाला.