जेंडर (पुस्तक) (आर.डब्ल्यू. कॉनेल)

'जेंडर ' हे आर.डब्ल्यू. कॉनेल[] या ऑस्ट्रेलियन समाजशास्त्रज्ञाने लिहिलेले जागतिक लिंगभाव दृष्टिकोन या विषयावरचे पुस्तक आहे. ते ब्लॅकवेल पब्लिशिंगने इ.स. २००२ मध्ये प्रकाशित केले.[]

ठळक मुद्दे

संपादन

वैयक्तिक जीवन, सामाजिक संबंध आणि संस्कृती यांमध्ये लिंगभाव हा एक महत्त्वाचे परिमाण कसा आहे हे लेखिका या पुस्तकात चर्चितात. लिंगभाव या संकल्पनेला समजण्यासाठी त्या विविध चर्चा व विचारांचा आढावा घेतात व जगातील विविध भागांतील संशोधन व विचार वाचकांपुढे मांडतात.

सारांश

संपादन

पुस्तकातील पहिले प्रकरण ३ भागांमध्ये विभागलेले गेलेले आहे. पहिल्या भागात लिंगभावाला ओळखून जगातील विभिन्न भागात लिंगभावावर आधारित जगण्याच्या एक पद्धती विशद केल्या आहेत. दुसऱ्या विभागात लेखिकेने लिंगभावाच्या संकल्पनेचा आढावा घेऊन, त्या बाबतीतील विविध वादविवादांच्या मुद्यांशी त्यांनी वाचकांची ओळख करून दिली आहे, व काही मुद्यांबाबत पर्याय देण्याचाही प्रयत्न केला आहे. तिसऱ्या विभागात लेखिकेने लिंगभावाची व्याख्या करून, त्या संदर्भातील विविध प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी नवीन परिभाषेची गरज मांडली आहे.

दुसऱ्या प्रकरणात लेखिकेने शाळा, खाणी, कामक्रीडा व युद्ध या लिंगभावाच्या विश्लेषणाच्या स्थळं बाबतीतील उदाहरणांची चर्चा केली आहे. लिंगभावावरील संशोधनातील काही समान विचारणा त्यांनी वर उल्लेखलेल्या चारी संदर्भांशी जोडली आहे.

तिसरे प्रकरण हे शारीरिक भिन्नत्वाच्या सर्वसामान्य मुद्यांबाबत भाष्य करते. तसेच सामाजिक संरचना व शरीर यामधील विविध संबंध ओळखून लेखिका वाचकांना शरीर व लिंगभाव याबाबत विचार करण्यास अधिक उपयुक्त अशी पद्धत प्रदान करते.

चौथ्या प्रकरणात लिंगभावासंबंधी घालून दिलेले नियम व त्या अवतीभवती व्यवस्थेसंदर्भात मांडणी सांगितली आहे. प्रत्येक संस्थेचे स्वतःचे लिंगभावासंबंधीचे नियम असलेले दिसतात व त्यांचे सूक्ष्म निरीक्षण केल्यास लिंगभावात्मक संबंध उलगडू शकतात. लिंगभावात्मक संबंध म्हणजे नेहमी स्त्री पुरुशांमधील प्रत्यक्ष संवाद नसून इतर संस्थांद्वारे (उदा. बाजार) अप्रत्यक्षपणे पण घडवला जातो व हे दोन्ही मिळून आपले रोजचे आयुष्य घडवते, असे लेखिकेने म्हणले आहे..

वैयक्तिक क्षेत्रात उद्भवणाऱ्या काही प्रश्नांबाबत ५व्या प्रकरणात परीक्षण केले आहे. लिंगभाव स्वतःमध्ये बाणवत मोठे होण्याची प्रक्रिया, लिंगभावात्मक ओळख व लैंगिकता यावर केलेल्या विविध अभ्यासातून या प्रकरणाची मांडणी पुढे आली आहे.

सहाव्या प्रकरणात आपल्या विश्लेषणाची व्यापती वाढवत लेखिका कंपन्या, सरकार, जागतिक समाज यांसारख्या मोठ्या संरचना व संस्थांचाही समावेश करतात. लेखिका येथे लिंगभावात्मक विषमता, शोषण व विषारीपण यांचे जागतिक लिंगभावात्मक व्यवस्थेचे वैशिष्ट्य म्हणून परीक्षण करतात.

सातव्या प्रकरणात लिंगभावाबाबतीतील विचारांचा इतिहास व ज्या अभ्यासकांनी ते विचार मांडले, त्यांचा अभ्यास केलेला आहे . पाश्चात्त्य लिंगभावाच्या सिद्धान्ता निर्मितीतील चार मुख्य प्रवाहांच्या रूपरेषा मांडून लेखक कॉनेलांनी आपली मांडणी केली आहे. १) विज्ञान, मतवैविध्य व साम्राज्य (१८६०-१९२०), २) मनोविश्लेषण व प्रतिक्रिया (१९२० - १९६५), ३) स्त्रियांची मुक्ती (१९६५-१९८०), ४) वैविध्यतेचे युग (१९८० -२०००).

आठव्या प्रकरणात लेखिका आर.डब्ल्यू. कॉनेल याया ज्याला लिंगभावाचे राजकारण म्हणतात त्याच्या रूपरेषा उलगडून दाखवतात. त्या अधोरेखित करतात की हे राजकारण जिव्हाळ्याच्या नात्यात घडत असले तरीही त्यात व्यापक सामाजिक संबंधांचाही समावेश आहे.

संदर्भ सूची

संपादन
  1. ^ "Bio". www.raewynconnell.net. 2018-03-24 रोजी पाहिले.
  2. ^ Connell, Raewyn (2009-03-23). Gender (इंग्रजी भाषेत). Polity. ISBN 9780745645674.