जेंडर हे भारतीय स्त्रीवादी लेखिका व्ही. गीता[] द्वारे लिखित व स्त्री (भटकळ व सेनची छाप असलेली) प्रकाशनाद्वारे प्रकाशित पुस्तक आहे. सदरचे पुस्तक हे नवीन अभ्यासकांसाठी 'रीडर'च्या स्वरूपात २००२ मध्ये प्रकाशित केले गेले व मैत्रेयी कृष्णराजनच्या 'थियरायझिंग फेमिनिझम' या शृंखलेची कडी आहे. भारतात हे एक महत्त्वाचे स्त्रीवादी लेखन मानले जाते.[]

ठळक मुद्दे

संपादन

पुस्तकाच्या प्रस्तावनेत व परिचयातच व्ही. गीता स्पष्ट करतात कि लिंगभावाच्या विचारला, उलगडून त्याला जगा कडे पाहण्याची एक दृष्टी म्हणून मांडणे हे त्यांचे उद्देश आहे. सत्ता व अधिकार हे कसे काम करते हे समजण्यासाठी लिंगभाव हे महत्त्वाचे आहे. रोजच्या सामाजिक जीवनात लिंगभाव सदर करण्याचा व्यापकपणा त्या प्रभावीपणे प्रकाशात आणतात. तसेच लिंगभावाकडे वर्णनाची व विश्लेषणाची श्रेणी म्हणून बघण्याच्या गरजेकडे लक्ष वेधतात.

सारांश

संपादन

पहिल्या प्रकरणात लैंगिक भिन्नतेचे तीन महत्त्वाचे लावलेले अर्थ मांडले आहे: १) स्त्री व पुरुषांसंदर्भातील धार्मिक समज २) स्त्री व पुरुषांमध्ये नैसर्गिकरित्या कांही गुण वैशिष्ट्य असतात हे स्वीकारणाऱ्या सामान्य व्याख्या ३) स्त्रीत्व व पुरुषत्वाचे नियम टिकून राहिले याचे समाजशास्त्रीय स्पष्टीकारणांचा खुलासा व विभागणी केलेली आहे.

स्त्रीत्व व पुरुषत्व या दोन कोटीक्रमाच्या व्यवहार, विचार व नैतिकतेमधील तणाव व त्या तणावाचे स्त्री-पुरुषांवर होणाऱ्या परिणामांचे परीक्षण लेखिका दुसऱ्या प्रकरणात करतात. तिसऱ्या प्रकरणात लेखिका 'भूमिकेचे सिद्धांताचे (जे कामाच्या विभागणीचा प्रवृत्ती म्हणून स्वीकार करते) कार्य प्रकाशात आणतात व बालपणापासून लिंगभावाच्या सादरीकरणाची प्रक्रियेवर भर देतात. चौथ्या प्रकरणात लिंगभावाचे विस्तृतीकरण करून ते इतर भिन्नतांशी (वंश, जात, वर्ग इ.) कसे संवादात असते हे लेखिका दाखवतात.

पाचवे प्रकरण हे पूर्वीच्या ४ प्रकरणांपासून वेगळे मार्ग निवडते व लैंगिक भिन्नतेचे विविध ऐतिहासिक स्पष्टीकारणांचा खुलासा देते. कसे, का व केव्हा स्त्री व पुरुषान वेगळे बघण्यात आले असे प्रश्न हे प्रकरण विचारते. लेखिका विविध प्रभावी लेखन जसे फ्रेडरेक ऐंगल्स द्वारा लिहिलेले 'द ओरिजीन्स ऑफ द फॅंमिली, प्रायव्हेट प्रोपर्टी व स्टेट व या भोवतीच्या विविध चर्चांचा आधार या पुस्तकात घेतात. तसेच त्या मानसशास्त्र व स्त्रीअभ्यासाच्या क्षेत्रातील प्रभावी लिखाणांवरही भर देतात. भारतीय संदर्भातील काही लिंगभावासंदर्भातील सिद्धांताकडे (जे पूर्वीच्या मांडलेल्या सिद्धांत व मांडणीवर पुनः काम केलेले स्वरूप आहे) पण लक्ष वेधतात.

सहाव्या प्रकरणात पुनः रोजच्या आयुष्याकडे परतून त्या लिंगभाव हे कशा स्वरूपात मूर्त रूप धारण करते, अनुभवले व जगले जाते या कडे बघतात. शरीराचे दिसणे, अनुभव व त्यावर लादलेल्या नियमांच्या द्वारे मानवी शरीर सादर होते या रोजच्या अभिव्यक्तींचे परीक्षण या प्रकरणात केलेले आहे.

योगदान

संपादन

लग्न, कुटुंब, लिंगभाव व विज्ञान या विषयांवरील स्त्रीवादी लेखनांमध्ये या पुस्तकाचा मोठ्या प्रमाणात पुरावा म्हणून वापर दिसतो.[][][]

संदर्भ सूची

संपादन
  1. ^ "V. Geetha | Author | Zubaan". zubaanbooks.com (इंग्रजी भाषेत). 2018-03-24 रोजी पाहिले.
  2. ^ Dash, Tapaswini (2003-07-01). "Book Reviews : V. Geetha, Gender, Calcutta: Stree, 2002, 149 pages, Rs 175". Gender, Technology and Development. 7: 271–273. doi:10.1177/097185240300700207.
  3. ^ Majumdar, Rochona (2009-03-23). Marriage and Modernity: Family Values in Colonial Bengal (इंग्रजी भाषेत). Duke University Press. ISBN 0822390809.
  4. ^ https://www.researchgate.net/profile/Deepak_Jain3/publication/268057573_TUBULIN_TARGETING_AGENTS__AN_INDISPENSABLE_CLASS_FOR_CANCER_TREATMENT/links/547835e90cf205d1687cb0f6.pdf#page=17
  5. ^ Dey, Anindita; Ghosh, Paromita (2016-02-01). "Do Human‐Figure Drawings of Children and Adolescents Mirror their Cognitive Style and Self‐Esteem?". International Journal of Art & Design Education (इंग्रजी भाषेत). 35 (1). doi:10.1111/jade.12034/full. ISSN 1476-8070. no-break space character in |title= at position 16 (सहाय्य)