जॅक्सनव्हिल (फ्लोरिडा)
(जॅक्सनविल या पानावरून पुनर्निर्देशित)
जॅक्सनव्हिल हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या फ्लोरिडा राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर फ्लोरिडाच्या ईशान्य भागात जॉर्जिया राज्याच्या सीमेजवळ अटलांटिक महासागराच्या किनाऱ्याजवळ व सेंट जॉन नदीच्या काठावर वसले आहे. ८.२१ लाख शहरी व १५.२५ लाख महानगरी लोकसंख्या असलेले जॅक्सनव्हिल अमेरिकेमधील ११वे मोठे शहर आहे. तसेच २,२९३ वर्ग किमी इतक्या विस्तृत भागात पसरलेले जॅक्सनव्हिल क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील सर्वात मोठे शहर आहे. अँड्र्यू जॅक्सन ह्या सातव्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाचे नाव ह्या शहराला देण्यात आले आहे.
जॅक्सनव्हिल Jacksonville |
||
अमेरिकामधील शहर | ||
| ||
देश | अमेरिका | |
राज्य | फ्लोरिडा | |
स्थापना वर्ष | इ.स. १८३२ | |
क्षेत्रफळ | २,२९२.९ चौ. किमी (८८५.३ चौ. मैल) | |
समुद्रसपाटीपासुन उंची | ९१० फूट (२८० मी) | |
लोकसंख्या (२०१०) | ||
- शहर | ८,२१,७८४ | |
- घनता | ४०९.९ /चौ. किमी (१,०६२ /चौ. मैल) | |
- महानगर | १५,२५,२२८ | |
प्रमाणवेळ | यूटीसी - ५:०० | |
coj.net |
बारमाही सौम्य हवा असणारे जॅक्सनव्हिल फ्लोरिडामधील एक मोठे पर्यटनकेंद्र असून येथे अनेक उल्लेखनीय गोल्फ मैदाने आहेत.
वाहतूक
संपादनजॅक्सनव्हिल आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील मुख्य विमानतळ आहे.
संदर्भ
संपादनबाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |