जिवा पांडु गावित
जिवा पांडु गावित हे महाराष्ट्रातील एक राजकारणी आहेत. ते सुरगाणा व कळवण येथून ७ वेळा आमदारपदावर निवडून गेले. २०१४ मध्ये त्यांना महाराष्ट्र विधानसभेचे तात्पुरते अध्यक्ष नेमण्यात आले. गावित हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य आहेत, व महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेतील एकमेव डाव्या गटातील सदस्य आहेत.
मुळचे सुरगाणा तालुक्यातील अलंगुण येथील रहीवासी असलेले माजी आमदार जिवा पांडु गावित हे महाराष्ट्रातील पेठ , सुरगाणा नंतर सुरगाणा,कळवण विधानसभा मतदारसंघातून सात वेळा निवडून आले होते
१९७८ : पहिल्यांदा आमदार
१९८०: दुसऱ्यांदा आमदार
१९८५: तिसऱ्यांदा आमदार
१९९०: चौथ्यांदा आमदार
१९९५ : पहिल्यांदा पराभव ( हरीचंद्र चव्हाण अपक्ष निवडून आले)
१९९९ : पाचव्यांदा आमदार
२००४ : सहाव्यांदा आमदार
२००९ : दुसऱ्यांदा पराभव ( ए टी पवार निवडून आले)
२०१४ : सातव्यांदा आमदार ( विधानसभा हंगामी अध्यक्ष झाले)
२०१९ : तिसऱ्यांदा पराभव(नितिन पवार निवडुन आले)
शेतकऱ्यांचे मुकरदम ते कर्तृत्त्ववान आमदार अशी त्यांची ओळख आहे शैक्षणिक प्रगतीसाठी विकासाच्या नव्या वाटेवर असलेला आदिवासी समाज हा पुर्वीपासून त्याच्या परंपरेने चालत आलेल्या मानसाच्या गळ्यात जणुकाही एक ताईत बांधुन ठेवले असावे वनहक्क दावे, रोजगार हमी, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना रेशनकार्ड मिळवून दिले ,बेघर लोकांना घरकुल योजना, रस्ते ,पाणी, वीज, शिक्षण,बोगस आदिवासी हट्टाव मोहिम राबविली शेतकऱ्यांच्या हितासाठी नाशिक ते मुंबई पर्यंत पायी लॉंग मोर्चा काढणे बदलत्या काळानुसार लोप पावत चाललेल्या संस्कृतीच्या आदिवासी भागातील संस्कृती लोककला प्रत्यक्ष अनुभवुन जपणे हे आजही महत्त्वाचे आहे हे त्यांचें सामाजिक विचार शैक्षणिक प्रगतीसाठी नेहमीच कर्तव्यदक्ष राहुन आदिवासी भागातील लोकांची परिस्थिती ही गरीबीची बेताचीच असल्याने आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ अलंगुण ता. सुरगाणा जि. नाशिक या संस्थेची स्थापना करून अतिदुर्गम भागात आतापर्यंत १९ प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू केल्या आहेत यात ,शहिद भगतसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अलंगुण,अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा अलंगुण,प्रगती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उंबरपाडा,अँड डि टि जायभावे विद्यालय घागबारी, अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा श्रिभुवन आणि चिंचले,आणी भेगुसावरपाडा,खिर्डीभाटी ,पाहुचीबारी,(पेठ) देवडोंगरा,आंबोली(त्र्यंबकेश्वर) अशा अनेक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय स्थापन करून ज्ञानदानाची विद्यापीठ मुक्तपणे आदिवासी भागात १९९४ पासून खुली केली आहेत त्यामुळे बरेच आदिवासी भागातील तरुण विद्यार्थी हे शिक्षणातील प्रगतीने घडुन पुढे आले आहेत
त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले
२००८ मध्ये कर्तुत्ववान आमदार पुरस्कार सार्वजनिक वाचनालय नाशिक ( न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते दिला)
२००८ गिरणागौरव पुरस्कार (कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक )
२०१६ सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार
२०१८ : फडकी फौंडेशन अकोले यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलं ( डॉ संजय लोहकरे )
विकासनामा प्रगतिचा हे पुस्तक म्हणजे आदिवासी समाजातील क्रियाशील कार्यकर्ते, म्हणून केलेल्या कामाचा आलेखच आहे अशा या कर्तबगार व्यक्तीमत्वला शुभेच्छा आहेत भावी समाजकार्यासाठी.
राजकीय कारकीर्द
संपादनगावीत ह्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ शेतकरी हक्कांचे वकील म्हणून केला आणि किसान सभेचे ते सदस्य झाले.[१] एक कट्टर कम्युनिस्ट असून, गावीत प्रथम महाराष्ट्र विधानसभेत सुरगाणा मतदार संघा मधुन १९७८ मध्ये एका कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) ति किटावर निवडून आले व हरिचंद्र चव्हाण ह्यांना फक्त चारशे वोटांने मात दिली.[२] १९८० च्या पुढील विधानसभा निवडणूकीमध्ये गावीत काँग्रेस उमेदवार सिताराम भोये ह्यांना सुमारे १८०० मतांने मात देऊन विजयी झाले.