जितेंद्र अंकुशराव देहाडे हे महाराष्ट्र राज्यातील काँग्रेसचे नेते आहेत.[१] जितेंद्र देहाडे हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस आहेत.[२] त्यांनी काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष म्हणून काम केले आहे.[३]

जितेंद्र देहाडे

जन्म २ ऑगस्ट १९७८
पिंपरी राजा, जिल्हा छत्रपती संभाजीनगर
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
शिक्षण पीएच.डी. (वनस्पतिशास्त्र)

प्रारंभिक जीवन संपादन

जितेंद्र अंकुशराव देहाडे यांचा जन्म २ ऑगस्ट १९७८ रोजी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील पिंपरी राजा गावात झाला.

शिक्षण संपादन

जितेंद्र देहाडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून त्यांनी वनस्पतिशास्त्रात मास्टर्स आणि पीएच.डी. केली आहे.

राजकीय कारकीर्द संपादन

जितेंद्र देहाडे हे सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस असून ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सक्रिय सदस्य आहेत.[२]  यापूर्वी ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अनुसूचित जाती (एससी) विभागाचे  कार्याध्यक्ष होते.[४]

पदे संपादन

  • २०२० -  जिल्हा उपाध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघ (NSUI)[५]
  • सरचिटणीस, उपाध्यक्ष आणि सचिव - महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस[६][७]
  • संचालक मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती
  • सिनेट सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ[८]

संदर्भ संपादन

  1. ^ "Jitendra Dehade(Indian National Congress(INC)):Constituency- AURANGABAD (WEST) (SC)(AURANGABAD) - Affidavit Information of Candidate:". myneta.info. 2024-01-04 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Maharashtra Budget 2023 | छत्रपति संभाजीनगर के जनप्रतिनिधियों ने बजट पर दी मिलीजुली प्रतिक्रिया, सत्ताधारियों ने बताया बेहतर; विरोधियों ने कही ये बात | Navabharat (नवभारत)". www.enavabharat.com. 2024-01-04 रोजी पाहिले.
  3. ^ पानसरे, जगदीश (2019-08-14). "दुसरी बेल वाजत नाही तोच साहेबांनी फोन उचलला : जितेंद्र देहाडे". Sarkarnama News. 2024-01-04 रोजी पाहिले.
  4. ^ "काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी देहाडे". Maharashtra Times. 2024-01-04 रोजी पाहिले.
  5. ^ "Pulwama attack: Parties slam attack on CRPF convoy, seek action". 2019-02-16. ISSN 0971-8257.
  6. ^ "निवडणुकीपर्यंत वातावरण बदलेल!". Maharashtra Times. 2024-01-04 रोजी पाहिले.
  7. ^ author/lokmat-news-network (2018-10-31). "राज्य सरकारच्या चौथ्या वर्धापन दिनी युवक काँग्रेसचे औरंगाबादेत अजबगजब 'निषेधासन'". Lokmat. 2024-01-04 रोजी पाहिले.
  8. ^ सकाळवृत्तसेवा (2018-10-09). "कुलगुरुंची माफी, कुलसचिवांची दिलगिरी". सकाळ. 2024-01-04 रोजी पाहिले.