जितेंद्र उधमपुरी
डॉ. जितेंद्र उधमपुरी (इ.स. १९४४:उधमपूरजवळ, जम्मू आणि काश्मीर, भारत - ) हे एक बहुमुखी प्रतिभेचे काश्मिरी लेखक व कवी आहेत.
उधमपुरींचे शिक्षण लहान खेड्यात झाले. गांधी मेमोरियल कॉलेज येथून त्यांनी इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेतले व डोगरी भाषेवर डॉक्टरेट केली.
कारकीर्द
संपादनडॉ. जितेंद्र उधमपुरी हे सुरुवातीला लष्करात नोकरीला होते. तेथे काही काळ काम केल्यानंतर ते आकाशवाणीत रुजू झाले. त्यांनी ३० वर्षे आकाशवाणीमध्ये सेवा केली व वरिष्ठ संचालक म्हणून निवृत्ती घेतली.
विविध भाषांत लेखन
संपादनउधमपुरी यांना डोगरी, हिंदी, उर्दू, पंजाबी, या भाषा अवगत असून या भाषांत त्यांनी ३० पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या पुस्तकांचे इंग्लिश, नेपाळी व चेक भाषांत अनुवाद झाले आहेत. 'The History of Dogri Literature' and 'The History of Dogra Culture' ही पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत..
काव्यलेखन
संपादनजितेंद्र उधमपुरी हे आधुनिक डोगरी कवितेचे प्रवर्तक मानले जातात. त्यांनी त्यांच्या कवितांच्या शैलीत अनेक प्रयोग केले आहेत.
डॉ. जितेंद्र उधमपुरी यांनी लिहिलेली पुस्तके
संपादन- जित्तो
- दीवाने गज़ल
- डुग्गरनामा
- गीतगंगा, वगैरे
पुरस्कार
संपादन- डॉ. जितेंद्र उधमपुरी यांना २०१५ सालचा अडीच लाख रुपयांचा राष्ट्रीय साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.