जांजुआ
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
जांजुआ राजपूत
संपादनजांजुआ (जांजूआ, जांजुहा, जंजुआह, जांजूवा, हिंदीत जंजुआ) ही दक्षिण आशियामधील एक लढाऊ राजवंशी जात आहे.
काही जांजुआ वंशज स्वतःला जाट वंशीय असल्याचे मानतात. जांजुआ राजपूत ही पाकिस्तानी पंजाबमधील फार शूर जात मानली जाते.
वैदिक काळापासून ते आधुनिक काळापर्यंत शतकानुशतके जांजुआ राजे, महाराजे, सत्ताधीश, सुलतान, नवाब आणि राजपुत्र यांच्या नोंदीचा इतिहास आहे. तेराव्या शतकाच्या सुरुवातीला आणि सोळाव्या शतकात दिल्लीच्या सुलतानी राजवटीविरुद्धचा उठाव, जांजुआ राजुपत्रांनी मोगल सम्राट बाबरला भारत जिंकण्यासाठी केलेली मदत, त्यांनी साम्राज्यवादी मोगल सेनेमध्ये सेनापती म्हणून केलेली सेवा व युद्धे, उठाव वगैरे गोष्टींची पंजाबच्या इतिहासात नोंद आहे.
भारतात ब्रिटिश राजवट असताना यांनी एक लढाऊ वंश म्हणून हुद्दा मिळवला होता व ब्रिटिशांच्या भारतीय सेनेमध्ये दोन्ही जागतिक युद्धांमध्ये मोठया संख्येने भाग घेतला होता.
जांजुआ राजपुतांचे सत्ताधाऱ्यांविरुद्ध सततचे प्रक्षुब्ध, अस्वस्थ, उघड विरोध करणारे वर्तन व सततचे उठाव हे वेगळेच वैशिष्ट्य आहे. जेव्हा त्यांचे साम्राज्यशाही हुकुमशाहीपासून वेगळे व स्वतंत्र राज्य असेल किंवा जेव्हा ते साम्राज्यशाही हुकुमशाहीसोबत राजकीयदृष्ट्या संबंधात व सेनेत सहभागी असतील तरच ते शांत असत अन्यथा नाही.
पूर्वेतिहास
संपादनजांजुआ राजपूत हे स्वतःला पांडव राजवंशाचे व अर्जुनाचे वंशज असल्याचा दावा करतात. मात्र सध्याचे जांजुआ हे बहुतांशी इस्लामधर्मी आहेत.
अर्जुन हा त्याच्या शौर्याबद्दल प्रसिद्ध असून महाभारतातला एक उत्कृष्ट योद्धा होता. त्याने अनेक बलाढ्य राजवटी जिंकल्या होत्या. त्याने कृष्णाची बहीण सुभद्रेबरोबर विवाह केला.
अर्जुनाचा पणतू महाराजा जन्मेजय हा सध्याच्या जांजुआ समाजाचा पूर्वज मानला जातो. जनमेजय हा पांडवांच्या नंतरच्या हस्तिनापूर राज्याचा राजा होता. इंद्रप्रस्थ (सध्याची दिल्ली) ही त्याची राजधानी होती.
मथुरेचा राजा ध्रुपद देव याचे सेनानी बाली व भीमवल यांनी राजा ध्रुपद देव याचा जनमेजयाचा(अर्जुनाच्या पांडव राजवंशाचा) वंशज असा उल्लेख केलेला आढळतो.
१२व्या शतकातल्या राजा अजमल देव जांजुआने मुसलमान धर्म स्वीकारून राजा मल खान हे नाव धारण केले. तेव्हापासून जांजुआ जमात मुसलमान झाली.
प्रसिद्ध जांजुआ
संपादन- राजा शाह नवाज खान
- मेजर जनरल इफ्तिखार जांजुआ
- ब्रिगेडियर अमीर गुलिस्तान जांजुआ
- राजा जफर उल हक
- राजा मल खान जांजुआ
- पाकिस्तानी सेनाधिकारी असिफ नवाज खान जांजुआ