जव, यव, सातू किंवा बार्ली ही एक धान्य आहे. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव Hordeum vulgare असे आहे. याचे कूळ -पोएसी (poaceae) आहे . याचे इंग्रजी नाव बार्ली असे आहे . जव म्हणजे ओट नाही आणि जवसही नाही.

जव ही भारतात प्राचीन काळीही माहीत असलेली आणि देशात आजही उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती तथा एक भरड धान्य आहे. भारतातापेक्षा परदेशांतच या पिकाची लागवड जास्त प्रमाणात होते. तेथे जनावरांचे खाद्य म्हणून वापरात आहे.

जवाचे रोप ७० ते ९० सेंटिमीटर उंचीचे असून पुष्कळ अंशी गव्हाच्या रोपासारखे असते. याची पाने गव्हाच्या पानापेक्षा खरखरीत असतात. पर्णपत्राची लांबी १५ ते ३० सेंटिमीटर असते. रोपाला तुरे (मंजिऱ्या) येतात. तुऱ्यांचा देठ चपटा असतो आणि त्या देठावर रांगेने कळ्या लागाव्यात तशा जवाच्या साळी लागतात. एका देठावर दोन्ही बाजूंना १० ते १५ साळी असतात. साळीमधे जवाचे दाणे असतात. जवापासून माल्ट बनवतात. सातूची खीर आणि लापशीही करतात.

आजारी लोकांना विशेषतः मधुमेही रोग्यांना पथ्यकर म्हणून या धान्याचा उपयोग होतो.

हे सुद्धा पहा संपादन