जयवर्मन तिसरा (ख्मेर: ជ័យវរ្ម័នទី៣; ?? - इ.स. ८७७) हा ख्मेर राजवंशाचा दुसरा सम्राट होता. या साम्राज्याच्या स्थापक दुसऱ्या जयवर्मनचा मुलगा असलेल्या या राजबद्दल इतिहासात कमी माहिती आढळते.

प्रासाद शकमधील वर्णनानुसार "एकदा हा हत्तींची शिकार करण्यास गेला असता हत्ती त्याच्या कचाट्यातून निसटला तेव्हा आकाशवाणी झाली की जर त्याने (जयवर्मनाने) अभयारण्ये उभारली तर त्याला तो हत्ती मिळेल."[]

जयवर्मनने इ.स. ८७५मध्ये इंद्रपूर (आताचे क्वांग नाम) येथे आपली राजधानी उभारली.

जयवर्मन इ.स. ८७७मध्ये मृत्यू पावला. याचा मृत्यू हत्तींचा पाठलाग करीत असताना झाला असावा अशी समजूत आहे.[]

याच्यानंतर इंद्रवर्मन पहिला ख्मेर सम्राटपदी आला.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ हिगहॅम, द सिव्हिलायझेशन ऑफ आंगकोर, पृ. ५९
  2. ^ ब्रिग्स, द एन्शियंट ख्मेर एम्पायर पृ. ९७

इतर संदर्भ

संपादन


मागील
दुसरा जयवर्मन
ख्मेर राजवंश
इ.स. ८५०-इ.स. ८७७
पुढील
पहिला इंद्रवर्मन