जपानच्या शाही आरमाराचा चौथा तांडा

जपानच्या शाही आरमाराचा चौथा तांडा (जपानी:第四艦隊 (日本海軍) दै-योन कांताइ) हा जपानच्या शाही आरमारातील लढाऊ जहाजांचा तांडा होता. हा तांडा तीन वेगवेगळ्या वेळी अस्तित्वात होता. पहिल्यावेळी रशिया-जपान युद्धात भाग घेणाऱ्या युद्धनौकांना हे नामाभिधान दिले गेले. त्यानंतर चीन-जपान युद्धात आणि शेवटी दुसऱ्या महायुद्धातील प्रशांत समुद्रातील लढायांमध्ये भाग घेणाऱ्या युद्धनौकांच्या समूहास हे नाव दिले गेले.