शंकरराव थोरात

(जनरल शंकरराव थोरात या पानावरून पुनर्निर्देशित)

लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंग पाटील‌-थोरात (१२ ऑगस्ट, १९०६:वडगाव, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र - ??) हे भारतीय सेनेचे माजी उपप्रमुख (व्हाइस चीफ ऑफ द आर्मी स्टाफ) होते. हे १९६२ च्या युद्धादरम्यान पूर्व कमानीचे सेनापती होते. दुसऱ्या महायुद्धादरम्यान थोरात ब्रिटिश भारतीय सैन्यातून जपान्यांशी लढले.

हे मूळ कोल्हापूरचे असून पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयात शिकले. त्यानंतर त्यांनी सँडहर्स्ट रॉयल मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला व रॉयल इंडियन आर्मीमध्ये कमिशन्ड ऑफिसर म्हणून भरती झाले.