डॉ. छाया महाजन (जन्म - १२ एप्रिल १९४९, काळेगाव, जि. अहमदनगर) []

या एक मराठी लेखिका आहेत. त्या औरंगाबाद येथील इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालयाच्या निवृत्त प्राचार्या आहेत. १७ व १८ जानेवारी २०१५ रोजी जालना येथे झालेल्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.

प्रबंधलेखन

संपादन

'पॉल स्कॉटच्या कादंबरीतील स्त्री व्यक्तिरेखा’ हा त्यांच्या पीएच.डी. पदवी साठीचा प्रबंधाचा विषय होता.[]

पुस्तके

संपादन
  • आजपर्यंत प्रकाशित झालेल्या पुस्तकांमध्ये ५ कादंबऱ्या, ८ कथासंग्रह, ६ ललित लेखसंग्रह, ५ बालसाहित्य, २ चरित्र, १२ भाषांतरित पुस्तके, २ इंग्रजी पुस्तके, आणि ३ हिंदी अनुवादित कादंबऱ्या यांचा समावेश आहे.
क्र. पुस्तकाचे नाव प्रकार प्रकाशन वर्ष प्रकाशन संस्था अन्य माहिती
०१ इन्सपायरिंग जर्नी: श्रीमती प्रतिभा देवसिंह पाटील २०१० एस चाँद अ‍ॅण्ड कंपनी न्यू दिल्ली. सहलेखिका - रसिका चौबे
०२ एकादश कथा कथासंग्रह २००० मेहता पब्लिकेशन, पुणे ४ थी आवृत्ती २०१६
०३ ओढ कथासंग्रह १९९७ साहित्य सेवा, औरंगाबाद
०४ कॉलेज कादंबरी २००६,

२००८, २०१५

मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे वि.स. खांडेकर पुरस्कार - २००७
०५ गगन जीवन तेजोमय ललित लेखसंग्रह २०१८ विश्वकर्मा प्रकाशन, पुणे
०६ तन अंधारे कादंबरी २००९ पद्मगंधा, पुणे
०७ दशदिशा ललित लेखसंग्रह २०१५ रजत प्रकाशन, औरंगाबाद
०८ धुळीच्या चमकत्या पडद्याआड ललित लेखसंग्रह
०९ नकळत कथासंग्रह १९९२ साहित्य सेवा, औरंगाबाद उत्कृष्ट लेखन पुरस्कार - १९९२.
१० पाण्यावरचे दिवे ललित लेखसंग्रह २०११ जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद  कृष्णाजी वामन कीर पुरस्कार २०१२
११ मानसी कादंबरी २००८ मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे अंकुर वाङ्मय पुरस्कार — २००९
१२ मुलखावेगळा कथासंग्रह १९८५ मेहता पब्लिकेशन, पुणे ४ थी आवृत्ती २०१६
१३ मोरबांगडी ललित लेखसंग्रह १९९३ साहित्यसेवा, औरंगाबाद
१४ यशोदा कथासंग्रह १९९१ मेहता पब्लिकेशन, पुणे ६ वी आवृत्ती २०१६
१५ राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील चरित्र २००८ रोहन प्रकाशन, पुणे
१६ राहिलो उपकाराइतुका कथासंग्रह २०१३ पद्मगंधा, पुणे राजेंद्र बनहट्टी पुरस्कार - २०१४.

अभिरुची गौरव पुरस्कार - बडोदा, गुजरात

१७ होरपळ कादंबरी २०१५ साकेत प्रकाशन, औरंगाबाद. वसंतराव दांदळे स्मृती पुरस्कार - २०१६
१८ डोईचा पदर आला खांद्यावरी कादंबरी २०२३ राजहंस प्रकाशन, पुणे,
१९ अज्ञात कथासंग्रह २०२० मेहता पब्लिकेशन, पुणे
२० माणसांच्या गोष्टी कथासंग्रह २०२४ रोहन प्रकाशन
२१ कोलावरी डी ललित लेखसंग्रह २०१९ संस्कृती प्रकाशन, पुणे
२२ चंद्राचे तुकडे ललित लेखसंग्रह २०२२ उत्कर्ष प्रकाशन, पुणे
२३ इवलेसे रोप बाल वाङ्मय १९८३ महाराष्ट्र राज्य साधना केंद्र, औरंगाबाद.
२४ भोवरा बाल वाङ्मय १९८९ महाराष्ट्र राज्य साधना केंद्र, औरंगाबाद.
२५ फुलाच्या गोष्टी बाल वाङ्मय १९९५ परिमल, औरंगाबाद
२६ रक्ताच रंग एक बाल वाङ्मय १९९४ साहित्य सेवा औरंगाबाद.
२७ विजय आमचाच होईल बाल कादंबरी २०१८ प्रकाशन विभाग, भारत सरकार, दिल्ली.
२८ कुमारांसाठी ए. पी. जे. अब्दूल कलाम चरित्र २०२२ साकेत प्रकाशन, औरंगाबाद
२९ आजीची वाणी - स्वच्छ जंगलाची कहाणी अनुवादित २०१७ केंद्रीय प्रसारण मंत्रालय, दिल्ली ४ पुस्तकांचा संच
३० मुलांचे प्रेमचंद - भाग ०१ अनुवादित १९९६ साहित्य सेवा, औरंगाबाद. ३ पुस्तकांचा संच
३१ मुलांचे प्रेमचंद - भाग ०२ अनुवादित १९९६ साहित्य सेवा, औरंगाबाद.
३२ मुलांचे प्रेमचंद - भाग ०३ अनुवादित १९९६ साहित्य सेवा, औरंगाबाद.
३३ निळ्या डोळ्यांचा माणूस अनुवादित १९९७ साहित्य सेवा, औरंगाबाद. मूळ लेखक - गि.द. मोपासा
३४ हरझॉग अनुवादित २००० साहित्य सेवा, औरंगाबाद. मूळ कादंबरी - नोबेल पारितोषिक विजेती कादंबरी,

लेखक - सॉलबेलो

३५ डिफेमेशन ॲण्ड डिस्पोलिएशन ऑफ इंडिया अनुवादित २०१३ भारतीय शिक्षण प्रशिक्षण प्रसारक मंडळ, दिल्ली मूळ लेखक - धर्मपाल
३६ रविंद्रनाथ टागोर यांच्या नाटिका अनुवादित २०१५-१६ साहित्य अकादमी, मुंबई
३७ स्मारक शिळा अनुवादित २०१९ साहित्य अकादमी, मुंबई मूळ लेखक - पुनत्तील कुन्हअब्दुल्ला
३८ विमेन इन पॉल स्कॉटस नॉव्हेल्स इंग्रजी १९९७ अल्ट्रा पब्लिकेशन, बंगलोर
३९ काळा पहाड २०२४ साहित्य अकादमी, मुंबई
४० मानसी  हिंदी भाषांतर २०१५ विकास प्रकाशन, कानपूर  
४१ तन अंधारे  हिंदी भाषांतर २०१६ विकास प्रकाशन, कानपूर
४२ कॉलेज हिंदी भाषांतर २०२३, विकास प्रकाशन, कानपूर

पुरस्कार आणि सन्मान

संपादन
  • 'नकळत' या लघुतम कथासंग्रहासाठी महाराष्ट्र शासन 'उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार' - १९९२
  • स्वामी रामानंद तीर्थ गौरव सन्मान पुरस्कार (साहित्य) - सप्टेंबर २००३.
  • सामाजिक, शैक्षणिक साहित्यासाठी 'स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा भूषण पुरस्कार' - सप्टेंबर २००४
  • मराठी वाङ्मयासाठीचा 'स्वातंत्र्यसेनानी विनायकराव चारठाणकर पुरस्कार' - नोव्हेंबर २००४.
  • 'कॉलेज' या कादंबरीसाठी महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक संचनालय, मुंबई ' वि. स. खांडेकर पुरस्कार' - २००७
  • 'मानसी' या कादंबरीसाठी 'अंकुर वाङ्मय पुरस्कार' - २००९
  • महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे तर्फे दिला जाणारा 'कृष्णाजी वामन कीर श्रेष्ठता पुरस्कार' 'पाण्यावरचे दिवे' या ललितगद्यास - २०१२
  • पुणे मराठी ग्रंथालयातर्फे दिला जाणारा 'राजेंद्र बनहट्टी पुरस्कार' - 'राहिलो उपकारा इतुका' या कथासंग्रहास- १८ जानेवारी २०१४
  • बडोदा (गुजरात) येथील 'अभिरुची गौरव पुरस्कार', 'राहिलो उपकारा इतुका' या कथासंग्रहास - २०१४
  • सन्मान कृतज्ञता स्नेहालय, अहमदनगर - २०१६
  • 'होरपळ' या कादंबरीसाठी 'वसंतराव दांदळे स्मृती पुरस्कार' - २२ जानेवारी २०१७
  • ज्योत्स्ना देवधर लेखिका - 'विशेष ग्रंथकार पुरस्कार', पुणे - २६ मे २०१९
  • वाङ्मय चर्चा मंडळ, बेळगाव (कर्नाटक) यांचा 'ललितगद्य पुरस्कर', 'गगन जीवन तेजोमय' या पुस्तकास - ८ जून २०१९
  • सूर्योदय सर्वसमावेशक मंडळ, जळगाव यांचा 'सौ. लिलाबाई दलिचंद जैन सूर्योदय बाल साहित्य पुरस्कार' - ८ मार्च २०२०
  • मराठी साहित्य मंडळ, ठाणे तर्फे 'राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार' 'चंद्राचे तुकडे' या ललितगद्यला - २०२२
  • महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे यांचा 'महाकवी कालिदास प्रज्ञावंत लेखक पुरस्कार' - जुलै २०२२
  • 'लायन्स द्रोणाचार्य अॅवार्ड', लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद (मेट्रो) शैक्षणिक कार्यासाठी - १६ सप्टेंबर २०२२
  • स्व. सौ. कांताबाई भवरलाल जैन 'सेवारत्न' पुरस्कार द्वारा सर्वोदय सर्व समावेशक मंडळ, जळगाव - २७ नोव्हेंबर २०२२
  • महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे यांचा 'महाकवी कालिदास लक्षवेधी पुरस्कार' - १९ जून २०२३

अधिक माहितीसाठी पाहा

संपादन

www.chhayamahajan.com

मराठी विश्वकोशातील माहिती Archived 2025-01-21 at the Wayback Machine.

संदर्भ

संपादन

Archived 2021-11-23 at the Wayback Machine.

अज्ञात (कथासंग्रह), २०२०, मेहता पब्लिकेशन, पुणे

  1. ^ a b "मराठी विश्वकोश". 2025-01-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2025-01-07 रोजी पाहिले.