या पद्धतीत मुळया न फुटलेल्या छाट्यावर कलमफांदीच्या छाट्याचे भेटकलम करून टे रुजवणमाध्ममात रुजवणीला ठेवतात. पूर्वी ही पद्धत खुंट व कलमफांदी यांच्या शरीरशास्त्राचा अभ्यासाकरता वापरत. मात्र ही रूजवण सूक्ष्मफवारापद्धतीच्या सहायाने करतात . कारण यात खुंटछाटे व कलमफांदी दोन्हीवर पाने असतात. आता ही पद्धत मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे. लिंबूवर्गीय फळझाडांच्या बाबतीत शाकिय खुंट वापरून अभिवृद्धी करतात. जिभली-कलम पद्धतीने कलमफांदी खुंट ट्याछावर बांधून खुंटछाट्याला संजीवकाचा वापर करून रूजवण माध्यमात व सूक्ष्मफवारागृहात रूजवणीला ठेवतात. या पद्धतीत खुंट व फांदीकलमाचा एकजीव होतो . व खुंटछाट्याला मुळया फुटतात . नंतर हे कलम माध्यमातून काढून कुंडीत लावतात.