चौदा ब्रह्म

(चौदा ब्रम्हे या पानावरून पुनर्निर्देशित)

समर्थांनी निवडलेली चौदा ब्रम्हे १. शब्द ब्रम्ह २.मीतीकाक्षर ब्रम्ह ३.ख्न ब्रम्ह ४. सर्व ब्रम्ह ५. चैतन्न ब्रम्ह ६.सत्ता ब्रम्ह ७. साक्ष ब्रम्ह ८.सगुण ब्रम्ह ९.निर्गुण ब्रम्ह १०.वाच्य ब्रम्ह ११.अनुभव ब्रम्ह १२. आनंद ब्रम्ह १३. तदाकार ब्रम्ह १४.अनिर्वाच्य ब्रम्ह

चौदा ब्राम्हंचे स्पष्टीकरण १. शब्द्ब्रम्ह:- अनुभव नसतांना होणाऱ्या भ्रमाला शब्द्ब्रम्ह म्हणतात. ब्रम्हाचा अनुभव स्वतःला काही नाही ; पण ब्रम्हविषयी काहीतरी वाचलेले अथवा ऐकलेले असते. त्याला धरून नुसत्या शब्दांनी ब्रम्हाचे वर्णन केले की, ब्रम्ह असे असे आहे. अशा वेळी सांगणारा व ऐकणारा या दोघांचाही घोटाळाच होतो. कारण कुणालाच ब्रम्हाचा अनुभव नसल्याने ज्ञान न होता भ्रमच होतो. हे शब्द ब्रम्ह.

२.मीतीकाक्षर ब्रम्ह :- मीतीकाक्षर ब्रम्ह म्हणजे एकाक्षर ब्रम्ह ओम हे एक अक्षर आहे. तेच ब्रम्ह

३.ख्न ब्रम्ह:- ख म्हणजे आकाश. ख ब्रम्ह म्हणजे आकाश हे ब्रम्ह आहे. हे आकाश महदाकाश असून ते व्यापक आहे. घटाकाश, मठकाश असल्या शब्दांनी सूचित होणारे मर्यादित आकाश येथे अभिप्रेत नाही. तर व्यापून असणारे जे महदाकाश ते येथे अपेक्षित आहे.

४. सर्व ब्रम्ह:- हे सूक्ष्म आहे. पंचभूतांच्या विश्वपसाऱ्यात जे जे सूक्ष्म तत्त्व दिसून येते ते ते सर्व ब्रम्ह आहे. यालाच सर्व ब्रम्ह म्हणतात. पंचभूतांच्या प्रचंड गुंतागुंतीत असणारे सूक्ष्म तत्त्व म्हणजे सर्व ब्रम्ह होय.

५. चैतन्न ब्रम्ह:- पंचभूतादी मायेला चेतविणारे जे चैतन्य आहे त्याला चैतन्न ब्रम्ह म्हणतात. माया ही पंचभूतादी विश्वोत्त्पत्तीचा खेळ करते . पण तो सर्व अचेतनाचा अथवा जडाचा बाजार आहे. जडाला चाळविण्यास काही प्रेरक लागते. अचेतनाला चेतविणारे म्हणजे प्रेरणा देणारे चैतन्य आहे त्यालाच चैतन्य ब्रम्ह म्हणले आहे.

६.सत्ता ब्रम्ह:- चैतन्यावर ज्याची सत्ता आहे ते सत्ता ब्रम्ह. जडाला प्रेरणा मिळाली कि ते हळू लागते; पण ही प्रेरणा देणारे काही तरी हवे म्हणजे प्रेरणेवर सत्ता किंवा अधिकार गाजविणारे कोणी तरी लागते. म्हणून चैतन्यावर जे सत्ता अथवा अधिकार गाजविते ते सत्ताब्राम्ह होय.

७. साक्ष ब्रम्ह:- त्या सत्तेला जे जाणते ते साक्ष्ब्राम्ह होय. सत्ता ब्रम्ह चैतन्यावर प्रभुत्व दाखविते किंवा अधिकार चालविते. आता ही सत्ता कुणाला तरी कळली पाहिजे. या सत्तेच ज्ञान ज्याला होते ते साक्ष ब्रम्ह . साक्ष म्हणजे साक्षी आणि साक्षी म्हणजे जो जाणतो तो. साक्षित्व म्हणजे वेगळेपणाने राहून अन्य वस्तू पाहणे अथवा जाणून घेणे. चैतन्यावर कुणाची तरी सत्ता आहे; ती सत्ता ज्याला कळते त्याला साक्षब्रम्ह म्हणले जाते.

८.सगुण ब्रम्ह :- साक्षत्व हा गुण आहे. हा गुण ज्याच्यापासून/ज्याच्याजवळ आहे ते सगुण ब्रम्ह म्हणावे. साक्षत्व म्हणजे पाहणे अथवा जाणणे. साक्षत्व ग एक गुणधर्मच आहे . तो गुण ज्यापासून येतो ते सगुण ब्रम्ह होय.

९.निर्गुण ब्रम्ह:- जेथे कोणतेही गुण उतरताच नाहीत ते तत्त्वतः निर्गुण ब्रम्ह म्हणावे . गुण हे येणारे जाणारे असतात. तेव्हा जेथे गुणच नाहीत अशा पदार्थांची तात्त्विकदृष्ट्या संकल्पना करता येते. जेथे गुण नसतात त्याला निर्गुण ब्रम्ह म्हणतात.

१०.वाच्य ब्रम्ह:- वाचेने जे जे ब्रम्हविषयी बोलता येते त्या बोलण्यावरून कळून येणारे वाच्य ब्रम्ह . जरी मुख्य ब्रम्हपर्यंत वाचा पोचत नाही, तरी अनेकदा वाचेन शब्द उच्चारून ब्रम्हाचे वर्णन केले जाते. म्हणजे ब्रम्हाचे स्वरूप सांगण्यास जी अनेक नवे व शब्द वापरले जातात त्यांना वाच्य ब्रम्ह म्हणतात.

११.अनुभव ब्रम्ह:- जे वाचेने सांगता येत नाही; पण अनुभवाला येते ते अनुभव ब्रम्ह होय. ब्रम्ह हा बोलण्याचा विषय नसून अनुभवण्याचा विषय आहे. प्रायः अनुभव हा शब्दांनी व वाचेने सांगता येत नाही. म्हणून अनुभाव्द्वारा कळणारे अनुभवले जाणारे ते अनुभव ब्रम्ह होय.

१२. आनंद ब्रम्ह:- आनंद हा वृत्तीचा गुण आहे. आनंद भोगणारी वृत्ती जेथे असते ते आनंद्ब्राम्ह. bramhachya अनुभवाने आनंद होतो. आनंद मनाला होतो; म्हणून आनंद हा मनोवृत्तीचा गुणधर्म आहे म्हणजे आनंदाचा अनुभव ही मनोवृत्तीचीच एक विशीष्ट अवस्था आहे. आनंदाचा अनुभव घेणारी वृत्ती जेथे असते ते आनंद ब्रम्ह म्हणले जाते.

१३. तदाकार ब्रम्ह:- तदाकार ब्रम्ह म्हणजे अभेद . अभ्यासाने अथवा निदिध्यासाने मनोवृत्ती ब्राम्हकार होते. त्याला तदाकार ब्रम्ह म्हणतात.

१४.अनिर्वाच्य ब्रम्ह :- जेथे संवाद संपतो ते अनिर्वाच्य ब्रम्ह होय. जेथे संवाद संपतो, जेहते वाचा खुंटते, जेथे बोलण्याची सीमा होते, ते अनिर्वाच्य ब्रम्ह. ते वाचेने सांगता येत नाही. तेव्हा जेथे वाचा कुंठीत होते, जेथून वाचा परत फिरते, ते अनिर्वाच्य ब्रम्ह म्हणले जाते.

ही चौदाही ब्रम्हे म्हणजे खरी शाश्वत ब्रम्हे नव्हेत. असे श्री रामदासस्वामिंचे सांगणे आहे. खऱ्या ब्रम्हावर निरनिराळ्या प्रकारांनी या ब्राम्हांचा अध्यारोप केला जातो. म्हणून या अध्यारोपाचा निषेध करावयाचा हवा. असा निषेध केला कि खरेखुरे एकमेवाद्वितीय ब्रम्ह कळणार नाही.