चेबोक्सारी रशियाच्या चुवाशिया प्रजासत्ताक या प्रदेशातील मोठे शहर आहे. चुवाशियाचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ४,५३,७२१ होती. येथील वस्तीमध्ये ६२% चुवाश तर ३४% रशियन वंशाचे लोक आहेत.

हे शहर व्होल्गा नदीवरील २,२७५ किमी विस्ताराच्या चेबोक्सारी जलाशयाच्या काठी वसलेले आहे. याच्या मुखाशी असलेल्या जलविद्युत प्रकल्पाची क्षमता १,४०४ मेगावॉट इतकी आहे.

चेबोक्सारी आंतरराष्ट्रीय विमानतळ या शहरास मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गशी जोडतो. याशिवाय सोची, सिंफेरोपॉल आणि अनापा या शहरांना मोसमी विमानसेवा उपलब्ध आहे.