चुन दू-ह्वान (कोरियन: 전두환; १८ जानेवारी १९३१ - २३ नोव्हेंबर २०२१) हा पूर्व आशियामधील दक्षिण कोरिया देशाच्या लष्करामधील एक वादग्रस्त जनरल व १९७९ ते १९८८ दरम्यान देशाचा हुकुमशहा होता. १९७९ ते १९८० दरम्यान लष्करी मार्गाने सत्ता बळकावल्यानंतर दू-ह्वान १९८० ते १९८८ दरम्यान दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष होता.

चुन दू-ह्वान

दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
१ सप्टेंबर १९८० – २५ फेब्रुवारी १९८८
मागील चॉय क्यु-हा
पुढील रोह तै-वू

जन्म साचा:जन्म दिनांक आणि
हापचॉन, दक्षिण ग्यॉंगसांग प्रांत, कोरिया
मृत्यू २३ नोव्हेंबर २०२१
धर्म बौद्ध

१९८० साली ग्वांगजू येथे घडलेल्या लोकशाहीवादी चळवळीदरम्यान झालेल्या हत्याकांडासाठी १९९६ मध्ये चुनला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली गेली होती. परंतु तत्कालीन राष्ट्राध्यक्ष किम यूंग-साम ह्याने आपले अधिकार वापरून ही शिक्षा रद्द केली.