चुंबकीय शाईच्या वर्णांची ओळख (इंग्लिश Magnetic Ink Character Recognition लघुरूप - MICR) ही जगातील बँकांनी धनादेशाच्या व्यवहारासाठी अवलंबलेली एक अभिनव पद्धती आहे. धनादेशावर चुंबकीय गुणधर्म असलेली शाई वापरून आकडे लिहिले जातात आणि ते एका विशिष्ट यंत्रामार्फत ओळखले जातात. ही पद्धती केनेथ एल्डरीजी याने शोधून काढली. .

चेकवर चुंबकीय शाई वापरून लिहिलेले आकडे.

धनादेशावरील वापर

संपादन

बँकेकडून खातेदाराला दिल्या जाणाऱ्या प्रत्येक धनादेशावर तळाशी चुंबकीय शाई वापरून काही आकडे आणि चिन्हे छापलेली असतात. या सर्व आकड्यांच्या मध्यावर साधारणपणे एक विरामचिन्ह असते. विरामचिन्हाच्या अलीकडील भाग ज्या बँकेमधून धनादेश काढला आहे त्या बँकेचे सांकेतिक नाव दर्शवितो आणि विरामचिन्हाच्या पलीकडील भाग ठेवीदाराचा खाते क्रमांक दर्शवितो. हे सर्व आकडे आणि चिन्हे चुंबकीय शाईत छापलेली असतात.

धनादेश वाचक

संपादन

चेकचे वाचन आणि वर्गीकरण करणारे एक यंत्र असते त्याला धनादेश वाचक किंवा रीडर किंवा सॉर्टर म्हणतात. या यंत्रात धनादेशांचा गठ्ठा ठेवला की, हळूहळू एकएक धनादेश पुढे सरकतो आणि एका विशिष्ट क्षणी तो चुंबकीय क्षेत्रातून जातो. त्याचवेळी चेकवरील शाई चुंबकीय बनते आणि चेकवरील आकड्यांच्या आणि चिन्हांच्या आकारावरून धनादेशावरील सर्व माहिती वाचली जाते. एका मिनिटात साधारणपणे २५०० धनादेश वाचून त्याची संगणकात नोंद करता येते.

भारतीय धनादेशावरील चुंबकीय वर्ण ओळख पट्टी

संपादन

भारतातील धनादेशावर खालील तपशील चुंबकीय स्वरूपात नोंदवलेला असतो

१) धनादेश क्रमांक

२)बँकेची माहिती - ९ आकड्यात नोंदवल्या जाणाऱ्या या अंकातील पहिले तीन अंक शहराबद्दल (पोस्टाच्या पिनकोड प्रमाणे), मधले तीन अंक बँकेला रिझर्व्ह बँकेने दिलेला संकेतांक आणि शेवटचे तीन अंक त्या शहरातील त्या बँकेच्या शाखेला बँकेने दिलेला क्रमांक असतात.

३) धनादेश प्रकार - खात्याच्या प्रकाराप्रमाणे आणि धनादेशाच्या स्वरूप प्रमाणे धनादेशाचा प्रकार बदलतो.उदा. चालू खात्यासाठी २९, रोख पत खात्यासाठी ३०, बचत खात्यासाठी ३१, लाभांश वितरक १४ इत्यादी

४) खात्याचा संक्षिप्त क्रमांक

५) रक्कम