चिल्ड्रन्स हॉस्पिटल, बॉस्टन

चिल्ड्रन्स हॉस्पिटल, बॉस्टन हे अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील बॉस्टन शहरात असलेले बालरुग्णालय आहे. जगातील सर्वोत्तम बालरुग्णालयांपैकी एक समजले जाणाऱ्या या इस्पितळात सुमारे दीडशे वर्षांपासून संशोधनही करण्यात येते. येथे विकसित झालेल्या उपचार व शस्त्रक्रियांमध्ये बालकांच्या हृदयातील दोष सुधारणे, कृत्रिम फुफ्फुस बसविणे, तसेच हृदयाचे प्रत्यारोपण करणे यांचा समावेश आहे.