चिमणराव हे चिं.वि. जोशी ह्यांच्या साहित्यातील एक प्रसिद्ध पात्र आहे. चिमणरावाचे चऱ्हाट अथवा शेंकडा शंभरांतल्या एका मनुष्याचें आत्मचरित्र ह्या शीर्षकाचे चिं.वि. जोशी ह्यांचे पुस्तक १९३३ ह्या वर्षी प्रकाशित झाले[]. ह्यात चिमणराव हे पात्र असलेल्या कथा एकत्रित करण्यात आल्या होत्या. ह्या संग्रहापूर्वी साधारणतः १९१७-१८पासून विविध नियतकालिकांतून ह्या कथा प्रकाशित होत होत्या.

संदर्भ

संपादन
  1. ^ दाते २०००, पान. ८३०.

संदर्भसूची

संपादन
  • दाते, शंकर गणेश (२००० (पुमु)), मराठी ग्रंथसूची भाग १ [१८००-१९३७], मुंबई: राज्य मराठी विकास संस्था |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)