मूळ संचिका(२,२२६ × ३,०९० पिक्सेल, संचिकेचा आकार: १.१९ मे.बा., MIME प्रकार: image/jpeg)

ही संचिका Wikimedia Commons येथील असून ती इतर प्रकल्पात वापरलेली असू शकते. तिचे तेथील संचिका वर्णन पान खाली दाखवले आहे.

सारांश

वर्णन
मराठी: रामेश्वर, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली

महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात, हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ हा बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे आद्य ज्योतिलिंग असलेला तालुका आहे. ह्या तालुक्यात १५०० लोकवस्ती असलेले रामेश्वर हे छोटेसं गांव आहे. औंढा नागनाथपासून अवघ्या २० कि.मी. अंतरावर जिंतूर ते औंढा नागनाथ मार्गावर वसलेलं रामेश्वर हे टुमदार गांव आहे. काही वर्षांपूर्वी रामेश्वरचं चित्र इतर गावांपेक्षा वेगळं नव्हतं. चिखलाने भरलेले रस्ते, उघडी गटारे, आपापसातील हेवेदावे, यांने हे गाव ग्रासले होते. या गावचा मुख्य व्यवसाय शेती असून कुकुटपालन, बकरीपालन इत्यादी जोडधंदेही आहेत. या गावात अनेक बचतगट स्थापन झाले असून गावातील महिला स्वंयरोजगाराच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. या गावात अंगणवाडी व जिल्हा परिषदेची पहिले ते सातवीपर्यंतची शाळा आहे. परंतु, गेल्या काही वर्षांपासून या गावात, गाव विकासाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. या गावात दरवर्षी पाण्याचा मोठा प्रश्न उद्भवत असे. समस्त गावकर्यांनी सार्वजनिक प्रयत्नातून विहीर खोदून त्याद्वारे आता घरोघरी पाण्याच्या व्यवस्था केली आहे. गावातील रस्त्याचे आता क्राँक्रिटीकरण करण्यात आले असून पथदिवे लावण्यात आले आहेत. घराघरातील सांडपाणी आता भूमिगत गटाराद्वारे बाहेर काढले जात आहे. बायोगॅस सयंत्र, हातपंप इत्यादीची सोय केली आहे. नदीचे पाणी अडवून ते शेतीकरिता वापरात आणले जात आहे. प्रामुख्याने आदिवासी वस्ती असलेल्या रामेश्वरमध्ये, शेतकरी, बारा बलुतेदार व इतर व्यावसायिक देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. श्री पांडुरंग, तत्त्वज्ञ संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु तत्त्वज्ञ संत तुकाराम महाराज यांचेवर विश्वास ठेवणारा वारकरी संप्रदाय समाजही मोठ्या प्रमाणात आढळतो. याच श्रध्देतून गावातील समस्त गावकर्यांनी स्वंप्रयत्नातून नदीच्या तीरावर श्री विठ्ठलाच्या मंदिराची उभारणी केली आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरेचे एक मूर्तिमंत प्रतिक म्हणजेच येथील श्री हनुमान मंदिर होय. हे मंदिर म्हणजेच सर्व धर्मीयांचे श्रध्दास्थान असून या गावातील समस्त नागरिकांनी एकत्र येऊन या मंदिराची पुनर्बांधणी व नूतनीकरण केले आहे.

रामेश्वर पासून ४५ कि.मी. अंतराव हिंगोली जिल्ह्यातील नरसी येथे संत नामदेवांचे जन्मस्थान असून, शिरड शहापूर येथे मल्लिनाथ दिगंबर जैन यांचे प्रसिध्द मंदिर आहे.
दिनांक
स्रोत स्वतःचे काम
लेखक विलास वि. घाटोळकर

परवाना:

I, the copyright holder of this work, hereby publish it under the following license:
w:en:Creative Commons
रोपण जसेहोते-वाटातसेच (शेअर अलाईक)
This file is licensed under the Creative Commons Attribution-Share Alike 4.0 International license.
तुम्ही मुक्त आहात.
  • सामायिक करा – नक्कल, वितरण आणि पारेषित करण्यास
  • पुर्नमिश्रीत करण्यास – काम गरजेनुसार अनुकुलीत करण्यास
खालील अटींच्या अधिन राहून:
  • रोपण – आपण योग्य क्रेडिट देणे आवश्यक आहे, परवान्यास दुवा प्रदान करणे आवश्यक आहे, आणि बदल केले गेले आहेत हे दर्शविणे आवश्यक आहे. आपण हे कोणत्याही वाजवी मार्गाने करू शकता, परंतु परवानाधारक आपल्यास किंवा आपल्या वापरास मान्यता देतो अशा कोणत्याही मार्गाने नाही.
  • जसेहोते-वाटातसेच (शेअर अलाईक) – जर तुम्ही या कामात काही बदल केलात, काटछाट केलीत, किंवा भर घातली, तर असे करून बनलेले नवीन काम तुम्ही केवळ या किंवा यासारख्याच परवान्याअंतर्गत प्रसारित करू शकतात.

Captions

Add a one-line explanation of what this file represents

Items portrayed in this file

depicts इंग्रजी

copyright status इंग्रजी

copyrighted इंग्रजी

२७ फेब्रुवारी 2017

source of file इंग्रजी

original creation by uploader इंग्रजी

संचिकेचा इतिहास

संचिकेची त्यावेळची आवृत्ती बघण्यासाठी त्या दिनांक/वेळेवर टिचकी द्या.

दिनांक/वेळछोटे चित्रआकारसदस्यप्रतिक्रीया
सद्य१५:१३, २७ फेब्रुवारी २०१७१५:१३, २७ फेब्रुवारी २०१७ आवृत्तीसाठी छोटे चित्र२,२२६ × ३,०९० (१.१९ मे.बा.)विलास वि. घाटोळकरCross-wiki upload from mr.wikipedia.org

खालील पाने या संचिकेला जोडली आहेत:

मेटाडाटा