चित्रित चकोत्री (पक्षी)

चित्रित चकोत्री, भेरकी कोंबडी किंवा चित्राळ चकोत्री (इंग्लिश:Painted Spurfowl; हिंदी:कंठकुक्कुट) हा एक पक्षी आहे.

चित्रित चकोत्री
चित्रित चकोत्री

हा पक्षी आकाराने गावतित्तिराएवढा असतो. नराच्या छातीचा रंग पिवळट. त्यावर काळे ठिपके. मादीचा वरील रंग गर्द तपकिरी आणि काळसर लाल. डोके काळे. पोटाखालचा रंग तपकिरी उदी. छाती पिवळट. पिवळट गळ्यावर काळसर लाल लाल रंगाचे अनेक प्रकारचे ठिपके.

वितरण

संपादन

चकोत्रीचे अंशतः क्षेत्र व्यापतो. गंगेच्या मैदानाच्या दक्षिणेपासून पश्चिम ग्वाल्हेर आणि बांगलादेश. फेब्रुवारी ते मे या काळात वीण.

निवासस्थाने

संपादन

दगड-गोट्यांनी युक्त डोंगराच्या पायथ्याला असणारी दात झुडपी जंगले आणि बांबूची वने.

संदर्भ

संपादन

पक्षिकोश मारुती चितमपल्ली