चिखल्या बाड्डा

एक पक्षी


चिखल्या बाड्डा किंवा पूणाडू (इंग्लिश:Garganey, Bluewinged Teal; हिंदी : खीरा, खीड, चेतवा, चैता, चैती, पटारी; संस्कृत : क्षुद्र हंस, साचि हंसक, हंस साचि; गुजराती : चेतवा; कन्नड : नीलि रेक्केय चरले,नीलि रेक्केय दासगोरे) हा एक पक्षी आहे.

चिखल्या बाड्डा
चिखल्या बाड्डा

या पक्ष्याचे नर आणि मादी हे दोघेही बदकापेक्षा लहान असतात. नराचे डोके गुलाबी उदी रंगाचे असते त्यावर पांढऱ्या रंगाच्या काड्या असतात त्याचा भुवया ठळक पांढऱ्या रंगाच्या असून त्याचे पंख आणि खांदे हे निळसर करड्या रंगाचे असतात. मादी दिसायला खूप सुंदर बटव्याच्या मादी सारखी असते, तिच्या रंगात पिवळसर झाक असते. पंखावर पुसट पट्टे असतात. ते सुंदर बटव्याच्या पट्ट्यांइतके ठळक नसतात. जवळून पहिले असता गळा शुभ्र पांढरा दिसतो. मादीला ठळक भुवया असतात.

Blue-winged Teal

हा पक्षी हिवाळ्यामध्ये हिवाळी पाहुणा म्हणून भारत आणि श्रीलंकेमध्ये आढळतो. तसेच तो पॅलिआर्क्टिक प्रदेशातही आढळतो. दलदलीचा भाग,सरोवरे आणि समुद्रकिनारे ही त्याची राहण्याची ठिकाणे असतात.

 
Blue-winged Teal (8457152262)
 
Blue-winged Teal (13813806594)

संदर्भ

संपादन