चिंचपेटी हार
हा एक स्त्रियांचा पारंपारिक उंच ताठ कॉलर असलेला दागिना आहे. हा दागिना मानेभोवती उंच ताठ कॉलर असल्यासारखा दिसून येतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे यावरती किर्तीमुख आणि मत्स्य यांचे नक्षीकाम असते. यामध्ये कीर्तिमुख याचे महत्त्व म्हणजे, हा दागिना परिधान करणाऱ्याला कीर्तिमुख नकारात्मक स्पंदनांपासून रक्षा करते आणि मत्स्य हे त्या व्यक्तीचे विचार पवित्र ठेवून त्यांची पवित्रता वाढविण्यास मदत करते.