चाल (भौतिकी)

speed is of vector quantity i. e. in marathi चाल and velocity is of vector quantity i. e. वेग

भौतिकशास्त्रानुसार चाल[] (मराठी नामभेद: द्रुतता[]; इंग्लिश: Speed, स्पीड) म्हणजे एखाद्या वस्तूच्या स्थानांतराचा दर होय. वेग या भौतिक राशीपेक्षा चाल वेगळी ठरते - कारण चालीतून एखाद्या वस्तूच्या स्थानांतराची केवळ शीघ्रताच व्यक्त होते, तर वेगातून वस्तूच्या स्थानांतराची शीघ्रता व तिची दिशा या दोन्ही बाबी स्पष्ट होतात. त्यामुळे चाल ही राशी अदिश ठरते, तर वेग सदिश ठरतो.

उदा.: "५ मीटर प्रतिसेकंद" हे मापन अदिश ठरते; कारण ते फक्त वस्तूची चाल दर्शवते. मात्र "पूर्वेकडे ५ मीटर प्रतिसेकंद" असे मापन सदिश ठरते.

व्याख्या

संपादन

एखाद्या वस्तूची चाल v, म्हणजेच v या वेगाचे "परिमाण", ही त्या वस्तूच्या r स्थितीचे काळावरील विकलज होय :

 

म्हणजे एखाद्या वस्तूने t एवढ्या काळात s एवढे अंतर कापले असल्यास, त्या वस्तूची चाल s या स्थानांतराच्या काळावरील विकलजाएवढी असते :

 

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ a b भौतिकशास्त्र परिभाषा कोश. p. ९७२.
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत