चाचेकेगोरी
चाचेकेगोरी हा एक समुद्रपक्षी आहे.
ओळख
संपादनहा केगोसारखा दिसणारा तपकिरी रंगाचा समुद्रपक्षी आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे शेपटीच्या वर वितभर लांबीचे एक पीस बाहेर येते. हे पीस रुंद,टोकाला बोथट आणि पिळलेले असते.खालच्या शरीराचा रंग पांढरा,तर वरील भाग गर्द तपकिरी असतो. सौम्य रंगाच्या अवस्थेत ह्या पक्ष्यांना काळे डोके आणि छातीवर गर्द पटटे असतात. मान आणि डोके यावर किंचित पिवळा वर्ण असतो तर पाय काळे असतात.
वितरण
संपादनश्रीलंकेत कोलंबो येथे हा भटका पक्षी आढळला. हिवाळ्यात हे पक्षी आफ्रिका, भूमध्य समुद्र आणि काळा समुद्र,क्वचित भारताचे समुद्रकिनारे आणि ऑस्ट्रेलिया भागात स्थलांतर करतात.
निवासस्थाने
संपादनयांचा निवास खुला समुद्र आणि किनारे अशा ठिकाणी असतो.
संदर्भ
संपादन- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली