चाई
चाई (Alopecia areata अॅलोपेसिया एरियाटा)म्हणजे डोक्यावरील फक्त काही भागातील केस गळून जातात पण ते परत उगवत नाहीत या विकाराला 'चाई' असे म्हणतात. हे शरीराच्या काही किंवा सर्व भागातून होणारा विकार आहे. पण डोक्यावरचे केस गळतात ते सहजतेने दिसून येतात त्याला अलोमता आणि चाई पडणे असेही संबोधन आहे. टक्कल पडणे हे चाईची पहिली लक्षणे आहेत. हा विकार पुरुष आणि स्त्रियांमध्ये समान संख्येने होतो. चाई संसर्गजन्य रोग नाही .
उपचार
संपादनआधुनिक वैद्यकशास्त्र या स्थितीवर कोणताही उपचार देऊ शकत नाही. आयुर्वेद मात्र जास्वंदीचा पाला, जपाळाचे बी उगाळून लावल्यास केस येऊ शकतात असे दाखले देतो. आयुर्वेद शास्त्रात याचा उल्लेख ‘इंद्रलुप्त’ या नावाने येतो.[१]
- ^ "चाई पडणे". Loksatta. 2022-03-31 रोजी पाहिले.