चांदबिबी (अन्य नावे, लेखनभेद: चांद बीबी, चांद सुलताना, चांद खातुन ;) (इ.स. १५५० - इ.स. १५९९) ही विजापुराची आदिलशाहीअहमदनगराची निजामशाही या दख्खनेतील साम्राज्याची राज्यपालक राणी होती. या राणीने विजापूर व अहमदनगरच्या राज्यांचे रक्षण करण्याचे काम केले. चांदबिबीला अहमदनगरमध्ये सम्राट अकबराच्या मुघल सैन्याशी झालेल्या लढाईमुळे ओळखले जाते या लढाईतून दोहा निर्माण झाला व चांदबिबी ला ठार मारले गेले . व ती अजरामर झाली.

चांदबिबी

जीवन संपादन

चांदबिबी ही अहमदनगराचा निजामशाह पहिला हुसेन याची कन्या व पुढे त्याचा वारसदार बनलेल्या बुऱ्हाण-उल मुल्काची बहीण होती. तिला अरबी, फारसी, मराठी, कन्नड, तुर्की इंग्रजी भाषा येत होत्या. चांदबिबीचा विवाह विजापुराचा पहिला अली आदिलशाह याच्याशी झाला. चांदबिबीला सतार वाजविण्याचा व फुलांची चित्रे काढण्याचा छंद होता .

विजापुरचे साम्राज्य संपादन

एका तहाप्रमाणे चांदबिबीचा विवाह विजापूर साम्राज्याचा राजा अली आदिल शाह पहिला याच्याशी झाला होता. आदिल शाह यांनी विजापूरमध्ये पूर्वेला एका विहीर बांधली आणि तिला चांदबिबीच्या सन्मानार्थ चांदबावडी असे नाव ठेवले. अली आदिल शाह शियापंथाय असले तरी अली आदिल शाह यांचे वडील इब्राहीम आदिल शाह पहिला यांनी सर्व साम्राज्य सुन्नी, हबशी व दक्खनच्या राजवटीमध्ये विभागले होते..

अहमदनगराच्या निजामशाहीचे रक्षण संपादन

इ.स. १५८० मध्ये पहिल्या अली आदिलशाहाच्या मॄत्यूनंतर आदिलशाहीत सत्तासंघर्षामुळे अंदाधुंदी माजली. सुमारे दशकभर चाललेल्या उलथापालथीअखेरीस आदिलशाहीची घडी नीट बसल्यावर विधवा चांदबिबी निजामशाहीतील अहमदनगरास परतली. इ.स. १५९६ ते इ.स. १५९९ या काळात तिने निजामशाहीचे तख्त राज्यपालक राणीच्या नात्याने सांभाळले. नोव्हेंबर,इ.स. १५९५ मध्ये निजामशाही बुडवण्यासाठी मोगलांनी अहमदनगरावर चाल केली. तेव्हा तिने निजामशाही सैन्याचे नेतृत्व करत मोगल सैन्यास अल्पकाळ रोखून धरले. कालांतराने चांदबिबीची मोगलांशी युद्धबंदीच्या तहाची बोलणी सुरू झाली, तेव्हा ती मोगलांना फितूर असल्याच्या अफवा निजामशाही सैन्यात पसरल्या व सैन्यात असंतोष पसरू लागला. निजामशाही सैन्यातील असंतोषाने भडकलेल्या काही लोकांच्या जमावाने चांदबिबीची हत्या केली. तिच्या मृत्यूनंतर चारच महिन्यांमध्ये मोगलांनी अहमदनगराचा पाडाव केला.

अहमदनगरच्या किल्ल्याला शत्रूने पाडलेले खिंडार चांदबिबीने एका रात्रीत बुजवले असे सांगितले जाते.

बाह्य दुवे संपादन