चर्चा:स्त्री सक्षमीकरण
१. वूमन एंपॉवरमेंटचा शोध मी इंग्रजी विकीपीडियावर घेतला. तिथे स्त्रीवाद आणि इतर स्त्रीविषयक पाने आहेत, मात्र स्त्री सक्षमीकरण पान मला तरी आढळले नाही. तसे खरोखर आहे काय? जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा.
२. जेंडर इक्वॅलिटीतल्या जेंडर साठी काही शब्द मराठीत वापरात (किंवा जुना दुर्लक्षित) आहे काय? लैंगिक हा शब्द सेक्शुअल याअर्थाने वापरला जातो. त्यात आणि जेंडर संकल्पनेत मोठा भेद आहे. त्यामुळे गोंधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दोन्हीबाबत जाणकारांनीच कृपया प्रकाश टाकावा. येथे मला असे वाटते स्वरूपाचे मतप्रदर्शन आणि चर्चा अपेक्षित नाही. धन्यवाद.
-मनोज ०५:५९, १७ मार्च २०१० (UTC)
- येथील संपादक व प्रबंधक (sysop) या नात्याने मी स्पष्ट करीत आहे की --
- दोन्हीबाबत जाणकारांनीच कृपया प्रकाश टाकावा. येथे मला असे वाटते स्वरूपाचे मतप्रदर्शन आणि चर्चा अपेक्षित नाही.
- हे वरील संपादकाचे वैयक्तिक मत आहे. मराठी विकिपीडियावर कोणालाही, कोठेही (विशेषतः चर्चा पानांवर) बदल करण्याची मुभा आहे. फक्त जाणकारांनीच मतप्रदर्शन किंवा लेखात बदल करावे असा मराठी विकिपीडियावर अजिबात नियम नाही.
- अभय नातू १५:४३, १७ मार्च २०१० (UTC)
एक सुचवावेसे वाटते : सिसॉपनी (किंवा अन्यांनीही) वरीलप्रमाणे खुलासे आणि सूचना विकीपीडिया परिचय (किंवा तत्सम) पानावर नोंदवाव्यात आणि ज्या कुणाला वरीलप्रमाणे स्पष्टीकरण द्यावेसे वाटेल त्याने त्या पानाची लिंक देऊन निर्देशित करावे. त्यामुळे १) परिचय आणि पॉलिसीच्या पानात भर पडत राहील २) विकीपिडीया पॉलिसी आपोआपच सर्वांकडून (विशेषतः नव्या सदस्यांकडून) वाचली जाईल आणि ३) प्रत्येक ठिकाणी यास्वरूपाची स्पष्टीकरणे देण्याने - आपल्याला खोडून काढण्यासाठीच कुणी बसला आहे, अशी जी भावना होऊ शकते, तीही टळेल. (माझ्या खाली असलेल्या आधीच्या पोस्टमध्ये या भावनेचे प्रतिबिंब दिसते आहे का?) - मनोज ०६:५०, १९ मार्च २०१० (UTC)
कोणत्याही चर्चेत कितीही मोठ्या अधिकारपदावरच्या माणसाने कितीही कठोर टिका केली. अवमानास्पद भाषा वापरली तरी आपली योग्य वाटलेली भूमिका, पातळी न सोडता आपले मत स्पष्टपणे आणि ठामपणे मांडण्याचे काम विकिपीडियावर मी मला योग्य वाटले तितका वेळ केले केले.मात्र सातत्याने येत असलेल्या काही अनुभवांवरून मी इथे येत राहाणे,योगदान करणे योग्य नाही असे माझे मत बनले आहे. त्यामुळे मराठी विकीपीडीयावरचे माझे योगदान देणे थांबवित आहे. या विश्वकोषाच्या मूळ लेख लेखनात गांभीर्यपूर्वक गुंतलेल्या सर्व सदस्यांना त्यांच्या हाती घेतलेल्या कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
ता. क.: पण थांबण्याने काय होईल... हा निर्णय बदलला आहे.
-मनोज २२:२२, १८ मार्च २०१० (UTC)
Start a discussion about स्त्री सक्षमीकरण
Talk pages are where people discuss how to make content on विकिपीडिया the best that it can be. You can use this page to start a discussion with others about how to improve स्त्री सक्षमीकरण.